केदारखेड्याजवळील अपघातात एक ठार

0

भोकरदन (जालना) / भोकरदन जालना रोडवर केंदारखेड्या जवळ भरधाव टँकरने मोटार सायकलला टक्कर देऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल चालक जागीच ठार झाला.

भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव येथील रहिवासी विठ्ठल सांडू जाधव (वय 40) यांचा अपघातात मृत्यू झाला असून संतुकराव धोंडिबा जाधव हे जखमी झाले आहे.

विठ्ठल जाधव आणि संतुकराव हे दोघे रविवारी संध्याकाळी जालना येथून मोटार सायकलवरुन गावाकडे परत येत होते.

भोकरदन-जालना रोडवर केदारखेडा येथील वैभव ढाब्या जवळ मागून येणार्‍या भरधाव टँकरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

यात विठ्ठल जाधव यांचा मृत्यू झाला तर, संतुकराव हे गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी रावसाहेब तुकाराम कोरडे यांच्या तक्रारी वरून टँकर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*