धानोर्‍यात दुसर्‍या दिवशीही तीन घरे फोडली

0
दोन दिवसात सात ठिकाणी चोरी
चोरट्यांचा धानोर्‍यात मुक्काम
बंद घरांना केले जातेय लक्ष
धानोरा ता. चोपडा | वार्ताहर :  येथील मार्गालगतच्या आणि नेहमी गजबजलेल्या भागात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन दोन दिवसांत सात ठिकणी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारच्या रात्री तीन घरे फोडीत एक मोटारसायकल चोरीचा प्रयत्न झाला होता. आज पुन्हा त्याच महामार्गावरील बंद घरांना चोरट्यांनी लक्ष केलेले दिसुन येत आहे.

येथील लक्ष्मीनगरातील महामार्गाच्या बाजुला असलेल्या गोपालजी या बंगल्याला सर्वप्रथम लक्ष करत चोरट्यांनी लोखंडी गेट आणि लाकडी दरवाज्याला असलेली कडी कोयंडे दगडाच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश करत घरातल्या कपाटातील कॅश ८ हजार लहान मुलीच्या पायातील चांदीचे कडे, कपाटातील सर्व सामानाची नासधुस केलेली आढळुन आली

हे घर गंगाधर भिवसन पाटील यांचे मालकीचे असुन ते बलढाण्याला राहतात. गेल्या वर्षीयाच घराच्या मागच्या साईडची लोखंडी गेटच्या खिडक्या तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. गोपालजी बंगल्याच्या बाजुलाच जगन वामन गुजर यांचे घर असुन त्यांच्या घराचे कडी-कोयंडे मशीन सहाय्याने कापण्यात आलेले आढळले.

मात्र हे कुटूंब जळगाव येथे स्थाईक झाल्याने घरात कोणत्याही प्रकारचा ऐवज नसल्याने चोरट्यांनी निव्वळ पाहणी करुन येथुन पळ काढल्याचे दिसत आहे. आपल्या बाजुच्या घरांत चोर्‍या झाल्याचे येथील रहिवासी छायाबाई वामन गुजर यांच्या लक्षांत आल्यावर सदर प्रकार उघडकीस आला.

चोरट्यांनी काही अंतरावरील सुवर्ण सागर नगरातील हरिभाऊ काशिनाथ चौधरी यांच्या मालकीच्या घराला लक्ष केले. चौधरी कुटूंब हे व्यवसायानिमित्त गेल्या तीन महिन्यांपासुन जळगाव येथे स्थाईक झाल्याने त्यांनी हे घर बिडगाव ता. चोपडा येथील मराठी शाळेतील शिक्षक सिताराम तडवी यांना भाड्याने दिले आहे. तडवी हे तीन दिवसांपासुन त्यांच्या मुळ गावी गेलेले होते. येथे देखिल कुलूप कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील सामानाची नासधूस केल्याचे आढळुन आले आहे.

घटनेचे वृत्त कळताच अडावद पो.स्टे.पोउनि सुदर्शन आवारी, संतोष पारधी, इब्राहीम शहा, रविंद्र सांळुखे, पोपा दिनेश पाटील आदींनी भेट घेऊन घटना स्थळांचा पंचनामा केला.

दिवसा पाहणी रात्री डल्ला – धानोर्‍यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या चोर्‍या पाहता घटना सारख्याच असुन केवळ बंद घरांनाच चोरट्यांनी लक्ष केलेले आहे. दिवसा विविध भागाची पाहणी करायची व रात्री डल्ला मारायचा अशी चोरट्यांची निती असल्याचे वरील घटनांवरुन दिसुन येते.

वारंवार त्याच घरांना लक्ष

चोरट्यांनी गेल्या दोन दिवसांत ६ ठिकाणी केलेल्या घरफोड्या बघता गेल्या वर्षी देखिल याच घरांना चोरट्यांनी लक्ष घालत चोरीचा डाव साधला होता. त्यामुळे विविध ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. असे बोलले जात आहे. दरम्यान एका पाठोपाठ झालेल्या ह्या चोरीच्या घटनांवरुन चोरट्यांचा मुक्काम हा धानोर्‍यातच असला पाहिजे.

पहिल्या दिवशी साळुंखे यांची मोटारसायकल क्र. एम एच १९ झेड ९६०१ चोरट्यांनी लांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रात्री गस्तीवर असलेले कर्मचारी फारुख तडवी, इब्राहीम शहा यांना पाहताच चोरट्यांनी दुचाकी येथील हॉटेल प्रशांत समोर सोडून मराठी शाळेजवळुन पोबारा केला होता.

तर साळुंखे यांच्या घराजवळील भास्कर सोनवणे यांच्याकडेही चोरीचा प्रयत्न झाला होता. याठिकाणी घराबाहेर बांधलेल्या वारराचा दोर कापलेला दिसुन आला. तसेच घरामागील माठ व ग्लास उचलून तो दुसर्‍या जागेवर ठेवल्याचे निर्दशनास आले आहे.

पळतांना माठ व ग्लासला धक्का लागुन आवाज येऊ नये म्हणुन चोरट्यज्ञांनी ही युक्ती शोधली असावी असा अंदाज लावला जात आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे धानोरा परिसरातील महिला मंडळांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले असुन पोलिसांनी काळजीपुर्वक लक्ष घालुन ह्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महिला वर्ग करीत आहेत. शेती शिवारातही दिवसेंदिवस वाढल्या चोरींच्या घटना घडत आहे.

LEAVE A REPLY

*