पारोळ्यात हाणामारी

0

पारोळा, । दि. 7 । प्रतिनिधी-झेंडे लावण्याच्या जुन्या वादातून ओतार गल्लीत दोन धर्मियांमध्ये दंगल होवून हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. रात्री उशिरा गर्दी वाढत होती. जखमीचे रात्री उशिरापर्यन्त जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

पारोळा येथे सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास शहरातील ओतार गल्ली भागात दोन गटात किरकोळ कारणावरून तूफान हाणामारी झाली.

यात तीन जन जखमी झाले आहेत. यात अनिल राजेंद्र लोहार 40,नंदलाल कन्हैय्यालाल लोहार 25,यांच्या डोक्यात लाकुड़ टाकून जखमी केले तर अभिजित ईश्वर पाटील यास व त्यांच्या आईस मारहाण केली.

त्यांना पारोळा कुटीर रुग्नलयात दाखल केले असता त्यांच्यावर डॉ सुनील पारोचे डाँ योगेश साळुंखे यांनी प्रथमोपचार केले. यावेळी मोठी गर्दी झाल्याने जय श्रीरामच्या घोषणा देण्यात येत होत्या.

यावेळी घटनास्थळी पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पंकज राठोड, सुनील साळूंखे, पंढरीनाथ पवार, बापू पाटील, रविंद्र रावते, नामदेव ठाकूर या पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन जमावाला पांगविले. परिसरात तनाव पूर्ण शांतता आहे परिसरात पोलिसंचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*