मामाच्या हत्येप्रकरणी भाच्यास 10 वर्षांची सक्तमजुरी

0

जळगाव / चोपडा तालुक्यातील वडती येथे आपल्या भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मामाच्या डोक्यात लाकडाने वार करून खून केल्याप्रकरणी आरोपी भाच्यास अमळनेर न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

न्यायाधीश डी. इ. कोठलीकर यांनी हा निकाल दिला.

20 ऑॅगस्ट 2015 रोजी आरोपी रोहिदास युवराज भिल हा (रा.वडती ता. चोपडा) येथे विटाभट्टी थापणारे मामा शांताराम भगवान भिल यांच्याकडे आला होता.

रात्री आरोपीची आई अंगणात बसलेले असताना आरोपी दारू पिऊन आईस मारहाण करीत होता. त्यावेळी आरोपीचा मामा आणि फिर्यादी शांताराम भिल बहिणीस सोडविण्यास गेला.

भांडण सोडवताना आरोपी रोहिदास भिल याने मामाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केल्यामुळे आरोपीचे मामा जागीच बेशुद्ध पडले. व आरोपी फरार झाला. तोपर्यंत मामा शांताराम भिल यांचा दवाखान्यात मृत्यू झाला.

मामाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे आरोपी रोहिदास भिल याच्यावर अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी आरोपीला लगेच अटक करून जळगाव येथील कारागृहात त्याची रवानगी केली. सदर खटल्यात 8 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली.

त्यात आरोपीची आई आणि मामी यांची साक्ष महत्त्वाची ठरल्याने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. इ. कोठलीकर यांनी आरोपीस दोषी ठरवत मामाच्या मृत्युस कारणीभूत ठरवले.

 

LEAVE A REPLY

*