प्रभाकर कला संगीत अकादमीच्या कलावंतांचा कथ्थक महोत्सवात सृजनशीलतेचा कलाविष्कार

0

जळगाव | प्रतिनिधी :  ‘ओ माझी रे…’, ‘वक्त ने किया क्या हँसी सितम’, ‘जिंदगी दो पल की’, ‘मोहे पनघट पें नंदलाल छेड गयो रे’ या सदाबहार जुन्या हिंदी गीतांवर नृत्याविष्कार करत कलावंतांनी सृजनशिलतेचा अविष्कार घडविला. मुगले आजमपासून ते शंकर महादेवनच्या आधुनिक गीतांपर्यंत नृत्याविष्कार करत रसिकांची दाद मिळविली.

प्रभाकर कला संगीत अकादमीतर्फे आयोजित ‘अर्घ्य’ नृत्य महोत्सवाच्या दुसर्‍यादिवशी कलावंतांनी जुन्या व नवीन हिंदी चित्रपट गीतांवर आधारित सृजनशील कलाविष्काराचे सादरीकरण केले.

ला.ना.विद्यालयाच्या गंधे सभागृहात आयोजित या महोत्सवाचे समारोप सोहळ्यास जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष माजी प्राचार्य अनिल राव, जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर आणि जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अकादमीच्या संस्थापिका डॉ.अपर्णा भट-कासार व किरण कासार यांची उपस्थिती होती.

डॉ.अपर्णा भट-कासार यांनी प्रायोगिक तत्वावर १५ जुन्या व नवीन हिंदी चित्रपट गीतांवर सृजनशील दिग्ददर्शन केलेले नृत्य कोमल चौहान, श्रिया वडोदकर, ऐश्वर्या परशुरामे, चेतना भिवसने, तनया पाटील, साक्षी माळी, राधिका सरोदे, तन्वी लाड, शिवानी जोशी, हिमांनी पिले, रूतुजा महाजन, स्मृती चौधरी, मृण्मयी कुळकर्णी, पियुषा जावळे, श्रावणी उपासनी, अक्षया दाणी, अवनी जोशी, हेतल चव्हाण, आरोही नेवे, सिद्धी कोठावदे, श्रावणी अर्णीकर, सेजल चौधरी, सानिका कानगो, भक्ती भोळे, रूची महाजन, समृद्धी रडे यांनी सादर केले.

माजी प्राचार्य अनिल राव यांनी अकादमी, डॉ.अपर्णा भट-कासार यांचे कार्य आणि कलावंतांचे कौतुक केले. रेवती ठिपसे व दिपक चांदोरकर तसेच पालकांनी मनोगत व्यक्त केले.

महोत्सवास सहकार्य करणार्‍या विजय डोहोळे, तनुजा महाजन, कोमल चौहान, राजेश नाईक, धर्मेंद्र चौहान, रुपेश महाजन, संतोष ठाकुर (मायटी), संजय सोनवणे, सुरेश जोशी आदींसह देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी दिपप्रज्वलन व नटराज पुजन करण्यात आले. अकादमीच्या २१ वर्षाच्या वाटचालींची व डॉ.अपर्णा भट-कासार यांच्या कारकिर्दीविषयीचा लघुपट सादर करण्यात आला.

सुत्रसंचालन डॉ.अपर्णा भट-कासार, डॉ.साधना पाटील व प्रा.स्नेहल परशुरामे यांनी केले. परिचय ऐश्‍वर्या परशुरामे, तनुजा पाटील यांनी करून दिला. रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रमुख अधिकार्‍यांची उपस्थिती
अर्घ्य नृत्य महोत्सवास दोनही दिवस जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी असलेले जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी पूर्णवेळ उपस्थिती देवून कलावंतांना प्रोत्साहन दिले.
नवीन नाट्यगृह विजयादशमीपर्यंत

महोत्सवात उपस्थितीत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना सुत्रसंचलकांनी नवीन नाट्यगृहाविषयी साद घातली. जिल्हाधिकार्‍यांनी प्रेक्षकांमध्ये बसूनच त्वरीत प्रतिसाद देत येत्या विजयादशमीपर्यंत जळगावकर कलावंतांसाठी नवीन नाट्यगृह उपलब्ध होईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे सभागृहात उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली.

LEAVE A REPLY

*