जिराळी येथे तरुण शेतकर्‍याची आत्महत्त्या

0
पारोळा |  प्रतिनिधी :  तालुक्यातील जिराळी येथे गेल्या दोन वर्षापासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कॅन्सर आजाराचा खर्चासह संपुर्ण परिवाराचा खर्च न पेलविल्याने दि. ६ ऑगस्ट रोजी  तरुण शेतकर्‍याने घरात गळङ्गास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

पारोळा तालुक्यातील जिराळी येथील शेतकरी खंडू नथ्थु पाटील यांच्या नावे ५ एकर बागायती व कोरडवाहू शेती असून त्यापोटी बहादरपुर विकासोकडून ९० हजारांचे कर्ज तर विहिर बांधकामांसाठी १५ हजारांचे कर्ज घेतले होते.

सन २०१४ ते २०१५ मध्ये कॅन्सरचा आजार झाला. यामुळे त्यांना दर महिन्याला आरोग्यावर खर्च होत होता. परंतु शेतीचे उत्पन्न पाहीजे तेवढे येत नसल्याने कर्ज ङ्गेडण्याची तळमळ असतांनाही भरू शकत नव्हते. त्यातच , गेल्या दोन वर्षापासुन दुष्काळी परिस्थिती आहे.

त्यामुळे शेतीचा खर्च ही निघत नसल्याने परिवाराचा खर्च कसा भागवायचा? या विवंचनेत ते राहत असत. यावर्षी त्यापेक्षा गंभीर परिस्थिती असल्यामुळे परिवाराचा खर्चासह स्वत:च्या आरोग्य सेवेचा खर्च पेलविणे शक्य नसल्याने दि. ४ रोजी घरात दोरीच्या सहाय्याने गळङ्गास घेत असतांना आईचे लक्ष गेल्याने त्यांनी आरडाओरड करुन ग्रामस्थांना जमवून दोरखंड तोडून त्यांना त्वरीत १०८ रुग्णवाहिकेने धुळे येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, दि. ६ रोजी उपचार सुरु असतांना दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

*