मैत्रीच गाव….

0

मैत्री म्हणजे एक अस रोपट असतं की जे मनामनात रूजत जात. विश्‍वास, सहकार्य आणि प्रेमाने ते बहरत जात. जीला जाती पाती, धर्म पंथ यांचा लवलेशही नसतो. अगदी बजरंगी भाईजान या चित्रपटासारखं.

ज्यात माणुसकीचा सुगंध वर्षानुवर्ष दरवळत राहतो.‘पानी रे पानी तेरा रंग कैसा ’ या नुसारच मैत्रीचेही आहे. ती कोणासोबत अशी ठरवून, जाणिवपूर्वक होत नाही किंवा करताही येत नाही. मग मैत्री होते तरी कशी ?

विचार, आचार, कार्य, सहकार्य, विश्‍वास या पंचसुत्री ज्यांच्यासोबत जुळली तेथे मैत्रीचा जन्म होतो. हो मात्र ती टिकवणे त्या दोघांच्याही हातात असते. पाण्यात जो रंग टाकतो त्या रंगाचे पाणी होत असते. मैत्रीचेही तसेच आहे. जर त्यात स्वार्थाचा रंग टाकला तर ती मैत्री स्वार्थी होते.

विश्‍वासघाताचा रंग टाकला तर ती विश्‍वासघातकी मैत्री होते.  विश्‍वासाचा रंग टाकला तर ते दोघेचे नव्हे तर त्या दोंघांची दोन कुटूंबे मैत्रीच्या धाग्यात गुंफली जातात. मैत्री कोणाशीही कधीही व केव्हाही होऊ शकते. विश्‍वासाच्या पायावर मैत्रीची इमारत उभी राहत असते.

अशी मैत्रीची भक्कम साथ मिळाली तर ते मित्र आपण सामान्य असूनही असामान्य असल्यासारखे स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात यशाची भरारी मारत असतात. तीही एकमेकांच्या साथीने.

मैत्री असते स्वच्छ निर्मळ पाण्यासारखी
पौर्णिमेच्या लख्ख चंद्रासारखी
त्या इवल्याश्या पणतीच्या इवल्याश्या वातीसारखी
कृष्णाच्या प्राणप्रियेराधेसारखी
वनवसातही सोबत करणार्‍या लक्ष्मण व सीतेसारखी

मैत्री होण्याचे किंवा करण्याचेही प्रकार आहेत. काहीतरी हेतू ठेवून केलेली मैत्री, समोर आहे म्हणून झालेली / केलेली मैत्री. अरे यांना आपण मदत करायला हवी असे जेव्हा अंतरात्म्याचा आवाज सांगतो त्यातून अंतरात्म्याच्या आवाजातून भावणीकरित्या, कळत न कळत झालेली मैत्री खरी मैत्री असते असे मला वाटते.

खर तर मैत्री ही त्या त्या मित्रांच्या गुणांवर, कर्तृत्वावर होत असते. चित्रपट अभिनेत्रींशी तर सर्वांनाचा मैत्री करायला आवडते. क्रिकेटच्या देवाशी अर्थात सचिनशी तर वय वर्ष पाच पासून तर वय वर्ष नव्वदीपर्यंतच्या सर्वच स्त्री पुरूषांना मैत्री करायला मनापासून आवडेल. याचे कारण शोधले तर त्या व्यक्तीमधील गुण हेच आपल्याल्या त्याच्याशी मैत्री करण्याची सुप्त इच्छा प्रकट करत असतात.

आपल्या रोजच्या आयुष्यात घडणार्‍या बर्‍या वाईट घटना, आपण घेतलेले निर्णय यामुळे आपल्याला नैराश्य येत असते. अशा काही बाबी आपण आपल्या मात्यापित्याशी बोलू शकत नाहीत. अशावेळी मैत्री आपल्या सोबत येते. की ज्याच्या/ जीच्याजवळ आपल मनं मोकळ करू.

त्यातून भलेही काही चांगला मार्ग निघणार नाही पण वाईटही निघणार नाही. तो फक्त एवढेच सांगेल ‘ मित्रा धिर धर, सर्व काही चांगले होईल, त्यासाठी मी तुझी मदत करतो.’

बस्स एवढ्याश्या वाक्याने आपल्या अंगात हत्तीच बळ येते. हीच खरी मैत्री आणि हीच खरी मित्रत्वाची शक्ती.
मैत्री कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ शकत नाही. असे होत असेल तर ती खरी मैत्री नव्हे. ती तर कुसंगत ठरेल. मित्र, मित्रत्वाच्या हिताची जपवणूक करणारीच खरी मैत्री असते. तीला वयाच बंधन नसत.

मैत्री म्हणजे नाव असतं
स्वत: मध्ये गजबजलेले गाव असतं
मैत्री म्हणजे शुध्द, स्वच्छ काया
नि मित्रावर करते आईप्रमाणे माया
मैत्री असते एक जागा
गुंतला जातो तेथे मैत्रीचा धागा
(संकलन/ शब्दांकन -पंकज पाटील)

LEAVE A REPLY

*