धरणगाव ग्रामीण रुग्णालयात पावणेचार लाखाचा घोटाळा

0
जळगाव । दि. 5 । प्रतिनिधी – शासनाकडून धरणगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला मिळालेल्या ग्रामीण आरोग्य अभियान व स्विंय प्रपजी खाताच्या शासनाच्या निधीत डॉक्टरांनी व कर्मचार्‍यांनी सुमारे पावणेचार लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अ‍ॅड. हरीहर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच या प्रकाराकडे जिल्हा शल्यचिकीत्सक कानडोळा करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
सर्व शासकिय रुग्णालयांना राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत निधी मिळत असतो.हा निधी पीएनए खात्यात जमा केला गेला पाहीजे.
परंतु धरणगाव ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी मिळालेला निधीचा वैयक्तीक वापर केला. तसेच डॉ. दिनेश खेताडे हे कनिष्ठ लिपीक आणि प्रयोग शाळेतील कर्मचारी यांचेकडून जमा झालेल्या शुल्कातुन रक्कम घेत असल्याची जिल्हा शल्यचिकीत्सक यांचेकडे लिपीक नंदकिशोर नकवाल यांनी दि. 22 फेब्रुवारी 2017 ला तक्रार केली होती.

यामध्ये दिलीप आमोदकर हे दि. 31 मे 2016 रोजी लिपीक पदावरून सेवा निवृत्त झाले आहे. परंतू त्यांनी अद्यापही पदभार सोडलेला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

तसेच प्रपंजी खात्यात भरावयास आलेल्या रकमेतून डॉ.खेताडे पैसे काढून घेतात. असा उल्लेख आहे.त्यावर सेवा निवृत्त लिपीक आमोदकर यांनी उत्तर देतांना डॉ.खेताडे यांनी वेळोवेळी पी.एन.ए. व एनआरएचएम मधून हात उसनवार पैसे घेतले आहेत.

जे अद्याप परत केले नाहीत.त्यांनी 1 लाख 30 हजारांची रक्कम दिल्या नंतर माझ्याकडे राहिलेली रक्कम वीस दिवसांनी देईल असे दि. 30 मार्च 2017 च्या पत्राच्या उत्तरात यांनी सांगीतले आहे.

तसेच रा.ग्रा. आरोग्य योजनेतील 1 लाख 51 हजार 152 रुपये हा निधी डॉ.खेताडे यांनी स्वत:साठी वापर केला आहे. रुग्ण कल्याण समितीतुन 1 लाख 22 हजार रक्कम मे 2016 ते जुलै 2016 दरम्यान स्वत:साठी वाटून घेतली आहे.

तसेच लेखापरिक्षकाने हा अहवालात 3.75 लाखांचा अपहार झाला असल्याचा अहवाल जिल्हा मुख्य शल्य चिकित्सकांना दिला आहे.

परंतु त्यावर कोणतीही कारवाई नसल्याचे त्यांनी सांगीतले. त्याचप्रमाणे दि. 18 जुलै रोजी कोल्हापूर येथून लेखापरिक्षक आले परंतु सहकार्य केले जात नाही.

याबाबत पोलिसात देखील तक्रार करण्यात आली परंतू त्यांच्याकडून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही.

 

LEAVE A REPLY

*