शेतमालाला हमी भाव न मिळाल्यास जनहीत याचिका

0

जळगाव । दि. 5 । प्रतिनिधी – राज्य शासनाने कर्जमाफी केली आहे. परंतू शेतकर्‍याच्या शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास राज्य कृषक समाजातर्फे राज्य सरकारविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कृषक समाजाचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शेतकर्‍यांच्या सातबारा कोरा झालाच पाहिजे, शासकीया नोकरदारांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार देतात परंतू लहान मोठा असा भेदभाव करुन शेकर्‍यांमध्ये भेदभाव करीत त्यांचे कर्ज का माफ करीत नाही.

सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले पाहीजे, शेतमालाला हमीभाव व अधिक 50 टक्के नफा द्यावा, पिकविम्या संबंधि आयात निर्यात धोरण बदलावे, वन्य प्राण्यांमुळे होणारी नुकसान भरपाई द्यावी, शेतमालात वाढ करण्यासाठी उद्योगासाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात, पिक कर्जाच्यामर्यादेत वाढ करावी, मालसाठविण्यासाठी गोडावून, कोल्ड स्टोरेज तयार करावे, दिवसातून 12 तास विद्युत पुरवठा देण्यात यावा, गावातील शेत जमिनीची सरकारी मोजणी करावी, गावातील नद्या, नाले, रुंदीकरण व खोलीकरण करण्यात यावे, शेतात रोजगार हमी योजना राबविण्यात यावी, कृषी शिक्षणाचा महाविद्याल, व शाळांमध्ये समवेक्षक शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार असावे यासह विविध मागण्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे.

मागण्या मान्य न झाल्यास येत्या काही महिन्यात राज्य सरकारविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी प्रशांत पाटील, वसंतराव महाजन, जगतराव पाटील, डॉ. टोके उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*