वनहक्क दाव्यासंदर्भात 28 ऑगस्टपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश

0
जळगाव । दि.5 । प्रतिनिधी-सामुहिक व वैयक्तीक वन हक्क प्रकरणांचा त्वरीत निपटारा करुन दि.28 ऑगस्टपर्यंत वनहक्क दाव्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज एका बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सामुहिक व वैयक्तीक वन हक्क प्रकरणांची आढावा बैठक जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे, अमळनेरचे प्रांताधिकारी संदिप गायकवाड, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास आर.बी. हिवाळे, भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकांत चिंचकर, वन विभागाचे अधिकारी तसेच वन हक्क समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

ज्या गांवामध्ये वनहक्क समिती गठीत झालेली आहे. त्या त्या गांवानी स्वांतत्र्य दिनाच्या ग्रामसभेत ठराव करुन समित्या गठीत कराव्या व वनहक्क दाव्यासंदर्भात 28 ऑगस्ट पर्यंत आपल्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करुन माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे सादर करावी.

वनहक्क संदर्भात महिन्याच्या पहिल्या शनिवारी आढावा बैठक आयोजित करण्यार्‍या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. जिल्हयातील सर्व आदिवासी आश्रमशाळांची तपासणी करुन अहवाल सादर करावा.

नवसंजीवनी समितीची बैठक आयोजित करावी. उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी पेसा क्षेत्रातील गावांची संख्या निश्चित करण्याची कार्यवाही त्वरीत करावी.

या बैठकीत कर्जाणे येथील विद्युत उपकेंद्र कार्यान्वीत करणे. चोपडा-उमर्टी रस्ता, वैजापूर आरोग्य केंद्राची इमारत बांधकाम आदिवासींना पीक कर्ज, वनहक्क समिती प्रशिक्षण आदि विषयावर चर्चा झाली.

पाटणादेवी येथील आकारण्यात येत असलेले वाहन शुल्क व प्रवेश शुल्क तत्काळ बंद करण्याच्या सूचना संबधीतांना दिल्या.

 

LEAVE A REPLY

*