चिनी वस्तूवरील बहिष्कारासाठी चिमुकले सरसावले

0
जळगाव । दि.5 । प्रतिनिधी-चिनी मालावर बहिष्कार, मेड इन इंडिया पहला प्यार, भारत मातेचा जयजयकार, अशा घोषणांच्या निनादात शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी आर.आर. विद्यालयाच्या प्रांगणात शपथ घेवून एल्गार पुकारला. यावेळी जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक कैलास सोनवणे यांनी चिनी वस्तूंवरील बहिष्कारासाठी मोहीम सुरु केली आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून आर.आर. विद्यालयाच्या प्रांगणात शहरातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून चिनी वस्तु बहिष्कारासाठी शपथ घेतली.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दीपक घाणेकर, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, नगरसेवक कैलास सोनवणे उपस्थित होते.

भरत अमळकर यांनी चिमणपाखरांना एका चिमणीचीच छान व प्रेरक गोष्ट सांगितली. भा. का. लाठी शाळा, अँग्लो उर्दू हायस्कूल, एमएआर अँग्लो उर्दू हायस्कूल, अभिनव विद्यालय, आर. आर. विद्यालय, न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, नूतन मराठा विद्यालय, गुळवे मुलींचे विद्यालय, जि. प. विद्या निकेतन, सागर हायस्कूल, राऊत विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. प्रास्ताविक एल. एस. तायडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

LEAVE A REPLY

*