सिलिंडरांच्या स्फोटाने वाकोद हादरले

0
वाकोद, ता.जामनेर । दि.5 । वार्ताहर-जळगावहून औरंगाबाद कडे गॅस सिलेंडर घेवून जाणार्‍या ट्रकला अचानक आग लागल्याने हळूहळू आगीने उग्रस्वरूप घेत ट्रक मधील 8 ते 10 गॅस सिलेंडर फुटून ट्रक जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री 11.30 वाजता साई पेट्रोल पंपाजवळच्या काहि अंतरावर घडली.
दरम्यान घटनास्थळी जामनेर,जळगाव,सिल्लोड येथून अग्निबंब बोलाविण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.
जळगावकडून भारतकंपनीच्या गॅस सिलेंडर भरून औरंगाबादकडे ट्रक जात असतांना ट्रकच्या कॅबिनमधून अचानक धुर येत असल्याचे ट्रक ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्याने खाली उतरून परिसरातील ग्रामस्थांना मदत मागितल्याने जवळच असलेल्या साई पेट्रोलपंपाजवळून अग्निरोधक बंब आणले असता आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रकच्या डिझेल टाकीला आगीची झळ पोहचताच मोठा स्फोट झाल्याचा आवाज आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली.

आगीने उग्र स्वरूप घेत मिनिटा मिनिटाने एका मागे एक असे 8 ते 10 गॅस सिलेंडर फुटत होते.हे सिलेंडर 100 ते 150 फुटापर्यंत हे सिलेंडर उडत होते.

आगीच्या झळा परिसरातील गावात पोहचत असल्याने अनेकांनी जवळच असलेल्या खेड्या पाड्यात, तांड्या वस्तीत पळ काढला.

घटनेस्थळी जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी तात्काळ भेट दिली.आग विझविण्यासाठी वाकोद येथील जैन फार्मरवरून तसेच जामनेर,जळगाव, सिल्लोड येथून अग्निबंब मागविण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.

महामार्गावर ट्रक पेटल्याने वाहतूक ठप्प होती सुमारे 1 ते 2 दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.यावेळी पहुर,जळगाव, जामनेर तसेच सोयगाव, फर्दापूर पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली.या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला.

 

 

LEAVE A REPLY

*