अमळनेरला पालखी सोहळ्यात संत संखाराम महाराजांचा जयघोष

0

अमळनेर | प्रतिनिधि :  संत सखाराम महाराजाच्या  जयघोषात  येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील पालखी मिरवणूक सोहळा  आज दि. 10 रोजी ऊत्साहात पार पडला.

पहाटे ६ वाजेला वाडी संस्थाना पासून निघालेली हि मिरवणूक रात्री ९ वाजता ठिकाणावर पोहचली  सजविलेल्या  पालखी चा मेण्यात लालजींची ऊत्सव मूर्ती स.६ वाजता ठेवण्यात आली.

देव परिवारा कडून पूजा करण्यात आली पालखीचा मेणा वाहून नेण्याची जवाबदारी परंपरे प्रमाणे भोई समाजाच्या कार्यकर्त्यांनी पार पाडले.

१५ तास मिरवणूक  

पालखी सोहळ्याला खान्देशातून हजारो भाविकांनी हजेरी लावली वाडी संस्थानातील मंदिरातील लालजींची ऊत्सव मूर्ती पहाटे विधिवत पूजा करून सजविलेल्या पालखीच्या मेण्यात ठेवण्यात आली परंपरेने पहाटे ६ वाजता हि मिरवणूक वाडी पासून निघाली तेथून राजहोळी चौकातून पानखिडकी ,जवळ दूपारी १२ वाजता पोहचली.

येथून शहरातील लेझीम ढोल वाद्य सहभागी झाले सराफ बाजार मार्गे दगडी दरवाजा ,फर्शी पूलावरून ,पैलाड मार्गे ,पून्हा बोरी पात्रात रात्री  ८ वाजे पर्यंत पोहचली त्यानंतर कसाली मोहल्यातून वाडी जवळ १० वाजेच्या सूमारास  पोहचून सांगता झाली.

अत्यंत चिंचोळ्या गल्लीतून हि मिरवणूक जाते तरीही हजारो स्त्रि पूरूष भाविकांनी शांततेत दर्शन घेतले सूमारे १५ तास हि मिरवणूक ढोल ताश्यांच्या गजरात मूखी हरिनाम जपत वारकऱ्यांच्या व भजनी मंडळाच्या ऊपस्थीतीत पार पडली शहरातील बहूतांश लेझीम मंडळांसह बँड पथक मानाच्या नारळावर  या मिरवणूकीत सहभागी होतात.

वैशाख वणव्याच्या रणरणत्या ऊन्हात पालखीच्या मागे सखाराम महाराज संस्थानचे गाधीपती प्रसाद महाराज अनवाणी चालून भविकांना आशीर्वाद  देत होते.

ऊत्सवाच्या काळात साक्षात पांडूरंगाचे याठिकाणी वास्तव्य असते असा समज भक्तांमध्ये आहे त्यामूळे या सोहळ्याला धार्मिक दृष्ट्या सर्वाधिक महत्व आहे आज रात्री ऊशिरा पर्यंत बोरी पात्रात ग्रामिण भागतील भविकांची गर्दी वाढली होती

पानसूपारी कार्यक्रम

पालखी मार्गात  २०० हून अधिक ठिकाणी प्रसाद महाराजांनी भेटी देवून पान सूपारी चा कार्यक्रम केला महाराजांना विशेष बंदूकधारी सूरक्षा पोलीस संरक्षण देण्यात आले होते दगडी दरवाजा पर्यंत व्यापाऱ्यांनी सावली साठी पालखी मार्गात मंडप टाकले होते त्यामूळे ऊन्हाचे चटके जाणवत नव्हते मात्र भर दूपारी ३ वाजे नंतर पालखी फर्शी पूलावरून गेली त्यावेळी ऊन्हाचे चटके असह्य होत होते
मोफत अन्नदान

पालखी मार्गात भाविकांसाठी अनेक सेवाभावी संस्थांनी पूढाकार घेत खिचडी, पोहे ,शिरा, साबूदाणे ,केळी,यासह सरबत ,ताक, थंडपाण्याची ,व्यवस्था केली होती . पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता
गूलाल ऊधळून महाराजांचे नृत्य

पालखी सोहळा ऊत्साहात पार पडल्यानंतर रात्री बोरी पात्रातील सखाराम महाराज समाधी स्थळा जवळ परंपरेनूसार गूलालाचा कार्यक्रम झाला यावेळी महाराजांनी फूलांचे पैंजण घालून आनंदात बेधूंद होवून  नाचत गूलाल ऊधळला. ऊद्या दि.11 ला वाडी मंदिराजवळ मोहन महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होईल

LEAVE A REPLY

*