राहुल सकट हत्त्येच्या निषेधार्थ मोर्चा

0
जळगाव । दि.4 । प्रतिनिधी-शहरातील राजीव गांधी नगरातील तरूण राहुल सकट याच्या हत्येच्या निषेधार्थ आज मांगगारूडी समाज युवा संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. दरम्यान आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संस्थेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली.
गेल्या महिन्यात राजीव गांधी नगरातील राहुल प्रल्हाद सकट या युवकावर चाकुने प्राणघातक हल्ला झाला होता. मुंबई येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.

या प्रकरणी सत्यासिंग बावरी, कालीबाई बावरी व अन्य एक यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ मांगगारूडी समाज युवा संस्थेतर्फे शिवाजी पुतळ्यापासुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात मांगगारूडी समाजातील युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा अडवण्यात आला. त्यानंतर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या घटनेप्रकरणी न्यायालयीन कामकाजासाठी विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी समाजाचे नेते अमर कसबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*