दादावाडीत मक्तेदारास साडेचार हजाराचा दंड

0

जळगाव । दि.4 । प्रतिनिधी-मनपा आरोग्य अधिकार्‍यांसह आरोग्य निरीक्षकांनी दादावाडी परिसरात स्वच्छतेबाबत पाहणी केली. दरम्यान, परिसरात अस्वच्छता आढळल्याने संबंधित मक्तेदारावर साडेचार हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दिली.

शहरात गेल्या 20 ते 22 दिवसांपासून दररोज स्वच्छतेबाबतची पाहणी करण्यात येत आहे. सकाळी दादावाडी परिसरात पाहणी करण्यात आली. पाहणीअंती परिसरात अस्वच्छता आढळून आढळल्याने मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

गोलाणी मार्केटमध्ये शौचालय कुलूपबंद
गोलाणी मार्केटमध्ये ग.स.सोसायटी समोरील शौचालय कुलूपबंद असल्याची तक्रार काही व्यापार्‍यांनी आरोग्य विभागाकडे केली होती. त्यानुसार आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी पाहणी केली असता. कुलूपबंद असलेल्या शौचालयात ठेवलेले साहित्य काढून खुले करण्यात आले. दरम्यान साहित्य ठेवल्यास गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*