दोन वर्षात दुध संघाची कामगिरी उत्तम -माजी खा. वसंतराव मोरे

0
पारोळा | प्रतिनिधी:   गेल्या दोन वर्षापासुन जळगांव जिल्हा दुध उत्पादक संघाची कामाची पद्धत बदललेली आहेे. त्यात अद्यावत मशिनरी घेऊन त्याचा फायदा शेतकर्‍यांना होत आहे. म्हणून शेतकरी व दुध संघाची उत्तम कामगिरी झाली आहे. त्यात संघाला १४ कोटी रुपये नफा झाला त्यापैकी ३ कोटी निव्वळ नफा व ११ कोटी शेतकरी हिताच्या विविध योजनेत व दुध संघाच्या नतुनिकरणाच्या कामात लावले अशी माहिती माजी खासदार व जळगांव जिल्हा दुध संघाचे संचालक ऍड वसंतराव मोरे यांनी पारोळा येथे आयोजित पारोळा विभाग आयोजित चेअरमन कार्यशाळेत दिली.

पारोळा येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता हरिनाथ मंगल कार्यालयात पारोळा, एरंडोल, भडगांव, चाळीसगांव, अमळनेर, पाचोरा तालुक्यातील प्राथमिक दुध उत्पादक सहकारी संस्थांचे चेअरमन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दुध संघाचे संचालक चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दुध संघाचे एम. डी. मनोज लिमये, प्रमुख प्रशासक डॉ. सी. एम. पाटील, संकलण व्यवस्थापक मृभेद्र पांडे, प्रविण पाटील, शिवसेना तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शेतकरी संघ अध्यक्ष चतुर पाटील, कृऊबा उपसभापती प्रेमानंद भटा पाटील, कृऊबा संचालक प्रा. बी. एन. पाटील, दगडू पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास पाटील, विजय जिवण पाटील उपस्थित होते.

यावेळी वर्षभरात चांगल्या कामगिरी करणार्‍या दुध संघाना बक्षिस देण्यात आले. त्यात भडगांव तालुक्यातील गोंडगाव, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडे, वेल्हाणे खु. चाळीसगांव तालुक्यातील तरवाडे यांना देण्यात आले. सात तालुक्यात २१५ दुध संकलन करणार्‍या सोसायट्या आहेत.

त्यात ४० महिला सोसायट्या आहेत. पारोळा शितकेंद्रावर दररोज ३६०० लिटर गाईचे व ३३०० लिटर म्हशिचे दुध संकलन होते. यावेळी डांगरी, मांडळ आदी चेअरमनांनी कृत्रीम रेतन करीता अमळनेर परिसरात कायमस्वरुपी कर्मचारी नेमण्याची मागणी केली तर दुधाच्या फॅट विषयी देखिल तक्रारी केल्या त्यात कपात ही वर्षभरासाठी ५० पैसे असावी अशी मागणी करत समस्या सांगितल्या व संचालक व कर्मचार्‍यांनी त्याचे सखोलपणे विचार केला.

माजी. आ चिमणराव पाटील यांनी सांगितले की, दुध संघात सुधारणा करत असतांना सुरवातीला उत्पादकांना त्रास होईल पण याचा फायदा शेवटच्या मानसापर्यत नक्की पोहचेल या वृत्तीने काम सुरु आहे. दुधाचा फॅट जास्तीत जास्त कसा वाढवता येईल याकडे उत्पादकांनी लक्ष द्यावे.

पूर्ण वर्षभरात ५० पैशांपेक्षा जास्त कपात होणार नाही अशी ग्वाही देतो. शेतकर्‍यांना परवडेल असाच दुधाचा भाव आम्ही यापुढे देत राहू जेणेकरुन तोट्यात जाणार नाही.

सुत्रसंचालन जयेश पाटील यांनी तर आभार पी. आर. पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी निलेश राजपूत, एम महाजन, राजेश पाटील, विनोद पाटील, एस. डी. सैंदाणे, सुरज जाधव परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*