उमविच्या प्राधिकरणाच्या निवडणूकीसाठी प्राचार्य आणि व्यवस्थापन गटाची सुधारित मतदार यादी प्रसिध्द

0
जळगाव. |  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राधिकरणाच्या निवडणूकीसाठी प्राचार्य आणि व्यवस्थापन गटाची सुधारित मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
  प्राचार्यांमधून अधिसभेवर दहा जागा तर व्यवस्थापन प्रतिनिधींमधून सहा जागा निवडून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी या दोन्ही गटाची तात्पुरती मतदार यादी जाहिर करण्यात आली होती.
यादीतील नावात काही बदल किंवा आक्षेप असल्यास त्यासाठी 31 जुलौ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने या दुरुस्तीसह मतदार यादी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावरीलwww.nmu.ac.in /election या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच मतदार यादया विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत कक्ष क्र.405 मध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
या यादीचे अवलोकन करुन यासंदर्भात काही आक्षेप असल्यास 7 ऑगस्टच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करता येतील अशी माहिती प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी  प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिली.

LEAVE A REPLY

*