धरणगावच्या इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सैनिकांना पाठवल्या राख्या

0
धरणगाव | प्रतिनिधी  :  येथील इंदिरा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थीनीनी स्वहस्ताने तयार केलेल्या सुमारे ३००० राख्या सीमेवरील सैनिक बांधवांना पाठविल्या.

अहोरात्र डोळ्यात तेल घालून सीमेवर संरक्षण करणार्‍या सैनिक बांधवांसुध्दा सणासुदीची उब मिळणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत ‘रक्षाबंधन’ या बहीण भावाचा प्रेमाला धाग्याचे प्रतिक आहे. सैनिक बांधवांना सुध्दा बहीणीचे प्रेम मिळणे आवश्यक आहे.

हे लक्षात घेऊनच येथील इ. १० वी चा विद्यार्थीनी विविध रंगाचे रेशीम धागे बंडल आणुन त्यातून सुबक अशा राख्यांची निर्मिती केली ही संकल्पना शाळेचे पर्यवेक्षक आर एस पडोळ यांनी विद्यार्थिनीसमोर मांडली व विद्यार्थिनींनी उत्साहाने या उपक्रमास सहमती दर्शविली.

विशेष म्हणजे राख्या बनविण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य विद्यार्थिनी स्वताच्या खाऊचा पैशातून आणतात व अतिउत्साहाने सहभाग नोंदवितात. साधारणता शाळा सुरु होण्याचा अगोदरी एक तास आधी येवुन गृपने राख्या तयार केल्या जातात. यासाठी कला-कार्यानुभव शिक्षक आर एन पाटील यांचे मार्गदर्शन लाभते.

शाळेचा उपक्रमाचे हे १८ वे वर्ष असुन दरवर्षी सीमेवरुन सैनिक, मेजर बांधवांचे सहानुभूती, अभिनंदन, आभार पत्र शाळेस येतात. नाशिक शिक्षण विभाग बोर्डनेसुध्दा या उपक्रमाबद्दल शाळेचे अभिनंदन केले आहे. इ. १० वी वर्गशिक्षक एन बी पाटील, सौस. बागुल, एस पी मुनरे यांचे विशेष सहकार्य असते.

शाळेचा उपक्रमाबद्दल संस्था अध्यक्ष डी जी पाटील, सचिव सी के पाटील, मुख्याध्यापिका सुरेखा पाटील, पर्यवेक्षक आर एस पडोळ, प्राथस. मुख्याध्यापक बळवंत पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे कौतुक केले.

LEAVE A REPLY

*