गौरवपार्कमधील सांडपाणी मनपात

0
जळगाव | प्रतिनिधी :  पिंप्राला परिसरातील वाटीकाश्रमजवळील गौरवपार्क येथे रस्ते व गटर नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहून नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत वारंवार तक्रार करुन देखील मनपा प्रशासनाकडून कुठलीही दखल जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाबाबत रोष व्यक्त करुन परिसरात साचलेले सांडपाणी डब्यात भरुन महापालिकेत आणले.

दरम्यान, सुविधा उपलब्ध करुन न दिल्यास दि.१५ ऑगस्टपासून परिसरातील रहिवासियांच्या कुटूंबियांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला.

यावेळी संदिप पवार, विवेक सुर्यवंशी, अरविंद जगताप, पंकज पाटील, गौरव पाटील, दिनेश चौधरी, नरेंद्र बागुल आदी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*