आयबॉलचा पॉवरबँक

0
आयबॉल कंपनीने १० हजार मिलीअँपिअर क्षमतेची पीबी-१००२६ ही पॉवरबँक बाजारात उपलब्ध केला असून याच्या मदतीने सर्व प्रकारचे स्मार्टफोनसह विविध उपकरणे चार्ज करता येतील.

आयबॉल पीबी-१००२६ हे मॉडेल ग्राहकांना २ हजार ९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. देशभरातील शॉपीजमधून ही पॉवरबँक उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये एलईडी पॉवर इंडिकेटर प्रदान करण्यात आले असून याच्या मदतीने चार्जींग स्टेटस कळण्यास मदत होऊ शकेल.

तर याला दोन युएसबी पोर्ट देण्यात आले असून या माध्यमातून एकदाच दोन उपकरणे चार्ज करता येतील. यातील लिथियम आयन बॅटरीमध्ये शॉर्टसर्कीट प्रोटेक्शन, ओव्हरचार्ज आणि ओव्हर डिसचार्जमधील सुरक्षा आदी महत्वाचे फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.

यामुळे याचा चुकून निष्काळजीपणे वापर झाला तरी उपकरणांना कोणताही धोका पोहचू शकत नसल्याचा आयबॉल कंपनीचा दावा आहे.

LEAVE A REPLY

*