अत्याधिक गोड खाण्यामुळे येते नैराश्य

0
लंडन | वृत्तसंस्था :  खारट आणि गोड पदार्थांचे सेवन बेतानेच करणे हितावह असते. अधिक मिठाने हृदयविकार होऊ शकतो आणि अधिक साखरेने मधुमेह! मात्र गोड पदार्थांचा हा ‘कडू’ परिणाम इतक्यापर्यंतच मर्यादित नाही. आता संशोधकांनी म्हटले आहे की, गोड पदार्थांच्या अत्याधिक सेवनाने डिप्रेशन म्हणजेच नैराश्य व अन्य काही मानसिक समस्या उद्भवू शकतात.

ब्रिटनच्या लंडन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले, साखरेच्या अतिसेवनामुळे मानवी आयुष्य मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेले आहे.

मात्र, आम्ही केलेल्या संशोधनात साखर आणि मानसिक आजार यांचाही परस्पर संबंध असू शकतो हे आमच्या लक्षात आले. त्याचा पुरुषांवर अधिक परिणाम होतो. मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकणारे अनेक घटक आहेत.

मात्र, शर्करायुक्त पदार्थ अधिक प्रमाणात खाणे किंवा पेय पिण्यामुळेही मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याचे नपेल म्हणाले. १९८३ ते २०१३ या कालावधीत गोड पदार्थ आणि पेयांमुळे पाच हजार पुरुषांचे तर दोन हजार महिलांचे मानसिक आरोग्य बिघडल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधकांनी रोजच्या आहारातील साखरेचे तीन गटांत वर्गीकरण केले. ६७ ग्रॅम साखरेचे सेवन करणार्या पुरुषांचे पाच वर्षांत २३ टक्के मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. साखरेच्या अतिसेवनामुळे उदासीनता, नैराश्य येण्याची शक्यता अधिक वाढते, असेही संशोधकांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*