जलसाक्षरतेसह आरोग्यावर रोटरी सेंट्रल विशेष लक्ष देणार

0
जळगाव | प्रतिनिधी :  रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलने पाण्याविषयी जनजागृती अर्थात जलसाक्षरता आणि आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. गेल्या नऊ पासून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवित आहे. यंदा देखील अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष संजय तोतला यांनी दिली.

शहरात रोटरी सेंट्रलची स्थापना नरेंद्र जैन यांनी २००६ मध्ये करण्यात आली आहे. दरम्यान रोटरी सेंट्रलची स्थापना झाल्यानंतर त्यांनी शहरापासून अवघ्याकाही अंतरावर असलेले कानळदा गावातील जिल्हा परिषदेची मुलींची शाळा दत्तक घेतली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत सुमारे ३५० विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत शाळेला संगणक, मुलांना खेळण्यासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले आहे. तसेच कानळदा गावाला पोलिओ मुक्त करण्यासाठी गावात पोलिओ दिनाच्या दिवशी जास्तीत जास्त बालकांनी पोलिओ घ्यावा याकरीता बालकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते.

जेणे करुन जास्तीत जास्त बालक पोलिओचा डोस घेवू शकतील. तसेच जलसंवर्धन करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी रोटरी सेंट्रलतर्फे अनेक कार्यशाळेचे आयोजन केले जात असते. गेल्यावर्षी रोटरी सेंट्रलकडून शहरातील वृद्धाश्रमात अन्नवाटप कार्यक्रम घेण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे महिलावर्गासाठी टु-व्हीलरच्या लर्निंग लायसन्स शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान भविष्यात देखील रोटरीतर्फे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलने केला आहे.

प्रकल्प प्रमुखांची नावे

रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे अनेक सामाजिक दायित्व ठेवून अनेक प्रकल्प राबवित असतात. यामध्ये इंटरनॅशनल सर्व्हीस प्रकल्प प्रमुख- डॉ. अंजू अमरेलिवाला, क्लब ऑफ ऍडमिनीस्ट्रेशन – नरेंद्र जैन, ओकेशनल सर्व्हीस- स्नेहलता परशुरामे, मेंम्बरशिप डेव्हलपमेंट- नयन शहा, मेडीकल सर्व्हीस कल्पेश दोशी, रोटरी इनफॉरमेशन- विष्णू भंगाळे, प्रोग्राम कमेटी- सुशिल राका, फेलोशिप- संजय जैन, फंडरेझिंग – भूणेश्वरसिंग, प्रशांत महाजन, लेडीज कमेटी-संगीता तोतला, ग्रीटींग कमेटी- शामकांम वाणी, बुलेटीन कमेटी- वीणा जैन, अटेंडेन्स कमेटी- रोशन पगारीया हे आहेत.

रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे व्हीजन

* जिल्ह्यातील जिल्पा परिषद व नगरपालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे शहरातील प्रत्येक शाळेतील पाण्याची टाकीची साफ सफाई करण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे.

त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल व त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.

* रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्याकडून गेल्या काही वर्षांपासून पाळधी येथे साई महोत्सव आयोजीत केला जात असतो. या महोत्सवात जिल्ह्यभरातून सुमारे ३०-४० हजार भाविक येत असतात.

या महोत्सवात रोटरी सेंट्रलतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे ५०० बाटल्या रक्त संकलन करण्याचा मानस रोटरी सेंट्रलने केला आहे.

* जनिमीतील पाण्याची जलपातळी वाढावी यासाठी रोटरी सेंट्रलतर्फे रेन वॉटर हार्वेस्टेटिंग, पाणी आडवा पाणी जिरवा, शोष खड्डे तयार करणे, वृक्षरोपण करणे यासारखे विविध कार्यक्रम आयोजीत करणार असून त्यासाठी जिल्हाभरात अनेक योजनांचे देखील राबविण्यात येणार आहे.

* शहरातील रोटरीचे सर्व क्लब मिळून अनेक उपक्रम आयोजीत करीत असतात. या उपक्रमात रोटरी सेंट्रल सक्रियपणे सहभाग होणार आहे. तसेच शहरातील ज्वलंत विषयांवर स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा संकल्प देखील रोटरी सेंट्रलने केला आहे.

* आताच्या काळात घरांतील व्यक्तींचा सुसंवाद कमी झाला आहे. हा सुसंवाद वाढविण्यासाठी रोटरी सेंट्रलकडून सुसंवाद शिबीराचे आयोजन करुन सुसंवाद वाढविण्यासाठी जनजागृती करणार आहे.

* रोटरी डिस्ट्रीक ०३३० यांच्यातर्फे अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जात असते. या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल सहभगी होवून योगदान वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच रोटरी क्लबमध्ये युवक व महिलांनचा नविन सदस्य म्हणून समावेश करण्याचा मनोदय रोटरी सेंट्रलने व्यक्त केला आहे.

रोटरीची क्लब ऑफ जळगाव सेंट्रलची कार्यकारणी

रोटरी क्लब ऑफ जळगावच्या सेंट्रलच्या अध्यपदी रो. संजय तोतला, सचिव सुनिल महाजन, माजी अध्यक्ष संतोष अग्रवाल, मानद सचिव मनोज पाटील, खजिनदार ओम अग्रवाल, सदस्य डॉ. राहुल मयुर, भूणेश्वरसिंग, महेंद्र रायसोनी, विष्णू भंगाळे, कल्पेश दोशी, सुशिल राका, संजय जैन, रोशन पगारीया, प्रशांत महाजन, कमलेश वासवाणी, नयन शहा, जितेंद्र शहा यांची निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

*