खूनाचा उलगडा होईना, कोर्टाने दिली नार्कोटेस्टची परवानगी

0

जळगाव / भादली गावातील भोळे वाड्यात 20 मार्च रोजी समाजमन सुन्न करणारी दुर्दैर्वी घटना घडली.

भोळे कुटुंबातील पती, पत्नीसह दोन मुलांचा रविवारी मध्यरात्री निघृर्ण खुन करण्यात आला होता. दीड महिना उलटूनही या हत्याकांडाचा तपास लागला नाही.

त्यामुळे खर्‍या मारेकर्‍यांच्या तपासासाठी पोलिसांतर्फे गावातील काही जणांची ङ्गनार्कोटेस्टफ करण्याची न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांनी 7 जणांच्या नार्को टेस्ट करण्याची परवागी दिली आहे. त्यासाठी या सातही जणांना मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

भादली येथील प्रदीप सुरेश भोळे (वय 45), पत्नी संगीता सुरेश भोळे (वय 35), मुलगी दिव्या प्रदीप भोळे (वय 8), तर मुलगा चेतन प्रदीप भोळे (वय 5) यांची 20 मार्च रोजी निघृर्ण हत्या करण्यात आली होती.

या घटनेला दीड महिना उलटला तरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला.

मात्र त्यातही अपयश आले. या प्रकरणी संशयीत किंवा हत्याकांडात वापरलेले हत्यारेही पोलिसांच्या हाती लागली नाहीत. परराज्यात, आजुबाजुच्या जिल्ह्यांमध्ये पथके पाठविली. मात्र तरीही पोलिसांच्या हाती निराशाच पडली.

नार्को टेस्टची मागणी…
या गुन्ह्यात तपास होणे गरजेचे आहे. पोलिसांसाठी हा गुन्हा आव्हानात्मक ठरला आहे. या प्रकरणात नशिराबाद पोलिसांनी एकूण 63 जणांचे जबाब घेतले आहेत. त्यातील काही साक्षीदारांनी दिलेले जबाब संशयास्पद आहेत. त्यामुळे त्यांची पॉलीग—ाफ, ब—ेन मॅपींग, नार्कोटेस्ट करण्याची मागणी सरकारपक्षातर्फे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*