पहूर येथे भरवस्तीत घरफोडी 26 तोळे सोने लंपास

0
पहूर, ता.जामनेर । दि.18 । वार्ताहर-पहूर पेठ येथील रहिवासी तसेच ठाणे येथे जिल्हा मुद्रांक अधिकारी म्हणुन कार्यरत असलेेले पाटील यांच्या बंद घरावर चोरट्यांनी पाळत ठेवुन धूम स्टाईल घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली.
असुन चोरट्यांनी 1 क्विटंन वजनाची तिजोरी लंपास केली असुन त्यात 26 तोळे 3 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. सुमारे 5 लाख 11 हजार रुपये किमतीच्या या दागिन्यांसह चोरट्यांनी पोबारा केला.
भरवस्तीत सोमवारी रात्री 3 वाजता घटना घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असुन पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे रहिले आहे. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

दिपक पंढरीनाथ पाटील हे पहूर पेठ येथील मुळचे रहिवासी असुन ते ठाणे येथे जिल्हा मुद्रांक अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. पहूर पेठ मध्ये भरवस्तीत त्यांच्या आई गंगाबाई या घरी एकट्याच असतात. परंतु त्या काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने त्यांच घर बंद होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी पाळत ठेवुन घराचा कडी कोएंडा तोडुन मध्यरात्री घरात प्रवेश करुन बेडरुम मध्ये ठेवण्यात आलेली जुनी 1 क्विंटल वजनाची लोखंडी तिजोरी लंपास केली.

चोरट्यांनी सराईत पणे धूम स्टाईलने तिजोरीसह दागिने 25 हजारांची रोकड घेऊन पलायन केले. मध्यरात्री तीनच्या सुमारास निळे व लाल रंगाच्या स्पोटर्स दुचाकीवरुन पाच चोरटे घराजवळ आले.

तीन जणांनी घराचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश केला. तर दोघे चोरटे पाळत ठेवत होते. असे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी विकास पांडुरंग पाटील यांनी सांगितले.

विकास रात्री गल्लीतच नेहमीप्रमाणे झोपले होते. त्यांच्या समोर हा प्रकार घडत असतांना तो काहीही करु शकला नाही. त्याच्या खाटेजवळ एक जण लाकडी दंडुका घेऊन उभा होता.

यात विकासने काही हालचाल करण्याचा प्रयत्न केला असता तर चोेरट्यांनी हल्ला केला असता असे त्याने सांगितले. तो अंगावर गोधडी घेऊन सर्व प्रकार टिपत होता.

पोलिसांनी घटनास्थळी घटनेची खबर मिळताच धाव घेतली. दिपक पाटील यांचे मोठे भाऊ अशोक पाटील आजुबाजुचे लोकही धावुन आले. सहाय्यक पोलिस निरिक्षक मोहन बोरसे, उपनिरिक्षक शिवाजी नागवे, उपनिरिक्षक सुनिल कदम, घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सकाळी 11 वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र बागुल, युनुस शेख, शरीफ काझी, रविंद्र पाटील यांनी माहिती घेऊन चोरट्यांना पकडण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान घटनास्थळी पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांनी भेट दिली. तसेच श्वान पथकातील हप्पी नामक श्वानाने घटनास्थळापासुन पहूर कडे येणार्‍या रस्त्यावर चोरट्यांनी तिजोरीवरील फेकलेल्या पट्टीपर्यंत येऊन श्वान थांबला त्याने पट्टीचा घास घेऊन हरीदास पांढरे यांच्या शेतापर्यंत त्याने रस्ता दाखविला.

संदिप पाटील व मनोज पाटील यांनी श्वान पथक घेऊन हजर झाले होते. राजेंद्र महाजन यांनी घटनास्थळी भेट देवुन अस्थाव्यस्त झालेले साहित्य व इतर वस्तुंची पाहणी केली.दोन ठसे संशयास्पद असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

या घटनेत जुन्या काळातील 1 क्विंटल तिजोरीतील 4 तोळ्याच्या 4 बांगड्या, 2 तोळ्याचे कंगन, 2 तोळ्याच्या नेकलेस, एक तोळ्याच्या कानातील बांगड्या, 1 साडेतीन तोळे ब्रासलेख, 1 तोळा साखळी, 2 अंगट्या, दोन तोळे सोन्याच्या बांगड्या 2 तोळे सोन्याचा घट, 2 तोळे चैन, 1 तोळा अंगठी, 1 तोळा सोन्याच मनी, सर्व दागीने सोन्याचे असुन एकुन 26 तोळे 3 ग्रॅम वजनाचे पाच लाख 11 हजार किंमतीचे दागीने लंपास केले. यात 25 हजार रोकडचा समावेश आहे. याबाबत महेश अशोक पाटील पहूर पेठ यांच्या फिर्यादीवरुन चोरट्यांविरुद्ध भा. द. वी. 457/380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*