न्यायालयाच्या निर्णयानंतर अमृत योजनेचे काम

0

जळगाव / अमृत योजनेबाबत नगरविकास विभागाचे मुख्यसचिव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी न्यायालयाच्या निर्णयानंतर काम सुरु करण्याची सुचना देण्यात आली.

hightअमृत अंतर्गत 249 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया देखील पार पडली.

मात्र मंजूर निविदाधारकाबाबत हरकत घेतल्यामुळे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, अमृत योजनेबाबत आढावा घेण्यासाठी मुंबईत नगरविकास विभागाचे मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आयुक्त जीवन सोनवणे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर योजनेचे काम तातडीने सुरु करण्याची सुचना मुख्य सचिवांनी दिली आहे.
उद्यान व भूमिगत गटारींबाबत

17 रोजी निर्णय
अमृत योजनेबाबत उद्यान विकसीत करण्यासाठी शहरातील चार जागा निश्चित केले आहे. त्यानुसार जागांचे 7/12 उतारे देखील शासनाकडे सादर केले आहे. तसेच भूमीगत गटारी आणि मल:निसारण प्रक्रियाप्रकल्पासाठी सहा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती दिली असून पुढील निर्णय दि.17 रोजी निर्णय होणार आहे.

LEAVE A REPLY

*