उमविच्या स्कूल ऑफ केमिकल्स सायन्सेसच्या तीन विद्यार्थ्यांची युपीएलमध्ये निवड

0
जळगाव :  उत्तर  महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस् विभागाच्या तीन विद्याथ्र्यांची  निवड युनायटेड फॉस्फरस लि.(युपीएल) या कंपनीने घेतलेल्या परिसर मुलाखतीद्वारे करण्यात आली आहे.
एम.एस्सी. पेस्टीसाईडस् आणि अॅग्रोकेमिकल्स या विषयासाठी  दरवर्षी युनायटेड फॉस्फरस लि. (युपीएल) या कंपनीतर्फे परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील 2017 मध्ये उत्तीर्ण झालेल्या  एम.एस्सी. पेस्टीसाईडस् अॅण्ड अॅग्रोकेमिकल्स् विषयासाठी द्विस्तरीय मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये या विभागाचा उमेश भोई, रोहित नाना पाटील आणि रोहित हिम्मतराव पाटील या तिघांची निवड झाली. या विद्याथ्र्यांना वार्षिक तीन लाख रुपये वेतन  देण्यात येणार आहे.
या विद्याथ्र्यांचे कुलगुरु  प्रा.पी.पी.पाटील,  विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.डी.जी.हुंडीवाले, केमिकल सायन्सेस्  प्रशाळेचे संचालक प्रा.डी.एच.मोरे,  विभागप्रमुख डॉ.रत्नमाला बेंद्रे आणि विभागाच्या प्राध्यापकांनी अभिनंदन केले. या व्यतिरिक्त याच वर्षी दोन विद्याथ्र्यांची क्रोडा प्रा.लि.आणि रोहा डायकेम प्रा.लि. या कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

*