शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे : जि.प. सदस्या निलम पाटील

0
चहार्डी ता.चोपडा  | वार्ताहर :  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी परंपरागत शेती व्यवसाया बरोबर दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे. कारण सध्या शेती व्यवसाय महागडी बी-बियाणे, रासायनिक खते व फवारणी औषधींचा खर्च उत्पादन खर्चापेक्षा जास्त होत असल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्ज बाजारी होत आहे.

वाढत्या कर्जामुळे शेतकरी संकटात येऊन आत्महत्या करीत आहेत. म्हणून आर्थिक प्रगतीसाठी शेती व्यवसायाला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय तरुण शेतकरी वर्गाने केला पाहिजे.असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या प्रा.डॉ. सौ.निलम पाटील यांनी कार्यक्रमात बोलतांना केले.

चहार्डी येथील श्रीदत्त दूध उत्पादक संस्थेने नवनिर्वाचित जि.प.सदस्या प्रा.डॉ. निलम शशिकांत पाटील व पं.स.सदस्या सौ.मालुबाई गोविंदा कोळी यांचा सत्कारा चा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सत्काराला उत्तर देतांना प्रा.डॉ. निलम पाटील बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन जगदीश निंबा पाटील होते.दूध संस्थेचे सभासद व गावा तील शेतकरी यांना जि.प. मार्फत पशुधन विकास कार्यक्रमांतर्गत पशुधन मेळावा आयोजित करू. त्यासाठी शेतकऱ्यांना व दुध उत्पादक संस्थेला जास्तीत जास्त सहकार्य करू असे आश्वासन प्रा.डॉ.सौ. निलम पाटील यांनी याप्रसंगी दिले.

सुरुवातीला दूध उत्पादक संस्थेच्या वतीने नूतन जि.प.सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील व पं.स.सदस्या सौ. मालुबाई कोळी यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कमलबाई कोळी यांनी देखील दोन्ही सदस्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.सदस्य आनंदराव शंकर रायसिंग,मार्केट कमिटीचे संचालक भरत बापूराव पाटील,माजी मुख्याध्यापक एच. ए.बाविस्कर,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जिजाबराव बळीराम पाटील,सुभाष नारायण पाटील,श्री.शिवाजी वि.का. सोसायटीचे चेअरमन दिनकर त्र्यंबकराव पाटील,चहार्डी वि.का.सोसायटीचे व्हॉ. चेअरमन अशोक नारायण पाटील,माजी उपसरपंच सुरेश दगडू धनगर, ग्रा.पं. सदस्य संदीप पाटील,धनंजय सुर्वे ,दूध संघाचे माजी प्रशासकीय सदस्य मनोहर मुकुंदा पाटील,तरुण कार्यकर्ते पिंटूभाऊ पाटील,अशोक पाटील,अनिल महाजन, दिलीप पाटील,श्रीदत्त दूध संस्थेचे व्हॉ. चेअरमन बापुराव धनगर,संचालक यशवंत पाटील,विनायक पाटील,विकास पाटील,गुलाब कोळी,बन्सीलाल पाटील, योगेश पाटील, समाधान पाटील,निलेश पाटील,अनिल पाटील,मुकेश पाटील, सुधाकर कोळी,ईश्वर महाजन,रेखाबाई पाटील,सुवर्णा पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेचे सचिव संजीव सोनवणे यांचा उत्कृष्ट काम व वाढदिवसा बद्दल माजी जि.प.सदस्य आनंदराव रायसिंग यांच्याहस्ते शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले.तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सचिव संजीव सोनवणे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेअरमन जगदीश पाटील, व्हॉ.चेअरमन बापूराव धनगर,सर्व संचालक तसेच कर्मचारी संजीव सोनवणे भानुदास पाटील,दिलीप पाटील,जगदीश पाटील आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमा ला विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, संस्थेचे सभासद बंधू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

LEAVE A REPLY

*