दहावीच्या विद्यार्थिनीचा दगडाने ठेचून खून

0
सोयगाव । दि.15 । प्रतिनिधी-हनुमंतखेडा (ता.सोयगाव) येथील 16 वर्षीच्या शालेय विद्यार्थीनीचे (दि.14) शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता अपहरण करुन दगडाने ठेचून खुन केल्याची घटना ( दि. 15) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थीनीचा मृतदेह घाटनांद्रा घाटात फेकून दिला.
स्वातंत्र सैनिक सरिचंद राठोड विद्यालय, हनुमंतखेडा येथे ही विद्यार्थींनी 10 वी वर्गात शिक्षण घेत होती. सीमा रामा राठोड (वय 15) असे या विद्यार्थीनीचे नाव आहे.

आई मजुरी करण्यासाठी व वडील शेळ्या चरण्यासाठी जंगलात गेले होते, त्यामुळे शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर आईला मदत म्हणुन आपण स्वयंपाक करुन ठेवु दिवसभर काम करुन थकलेल्या आईस तितकीच मदत होईल म्हणून भाकरी टाकण्यासाठी पिठाचा डबा काढला, माठात पाणी घेण्यासाठी गेली पण माठ कोरडा होता, त्यामुळे पीठ झाकुन सीमा सुमारे 300 फुट अंतरावर पाणी आणण्यासाठी गावाजवळील विहिरीवर गेली.
गावात जलवाहिनीचे काम सुरू असल्याने तीन-चार दिवसापासून नळाला पाणी आलेले नव्हते. सीमा पाणी घेवुन परत आली नाही.

म्हणुन आई वडीलांनी व गावातील मंडळींनी सीमाचा शोध घेतला. नातेवाईकांना फोन करुन विचारले पण रात्री उशिरापर्यंत तपास लागला नाही. म्हणून सकाळी पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली, व बनोटी पोलीस दुरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यासाठी गेले, तेव्हा पोलीस शिपाई योगेश झाल्टे यांना दूरध्वनी आला की, घाटनांद्रा घाटात एका मुलीचा मृतदेह पडलेला आहे, अशी माहिती मिळाली, ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह सीमाचा आहे असे सांगितले.

सीमाला दगडाने ठेचून मारण्यात आले आहे. घटनेचा पोलीसांनी पंचनामा करून प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यासाठी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात पाठवले घटनास्थळावर श्वान पथकाव्दारे चौकशी करण्यात आली. सिल्लोड पोलीस निरीक्षक शंकर शिंदे व सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित बडे पुढील तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*