जीवनदानासाठी रक्तदान चळवळ

0

अमोल कासार,जळगाव / रुग्णांना जीवनदान मिळावे व समाजसेवेच्या जाणीवेतून शहरात इंडियन रेडक्रॉस सोसायटी गेल्या 37 वर्षांपासून कार्यक्षमपणे कार्य करीत आहे.

8 एप्रिल हा दिवस सर्वत्र जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जात असतो.

यंदा विविध सामाजिक उक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यामध्ये दुर्धरआजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना शुद्ध रक्त मिळावे यासाठी रक्ताचे ल्युकोरीडक्शन करण्याचा उपक्रम सरु करण्यात येणार आहे. त्यामुळे ही प्रक्रीया झालेले रक्त रुग्णांना दिल्यास रुग्णांच्या आयुष्य एक आनंदाची पालवी फुटणार आहे.

रुग्णांना जीवनदान मिळावे यासाठी विविध सेवाभावी संस्थांकडून रक्त संकलन संस्था सुरु करण्यात आल्या आहे. त्यापैकीच एक संस्था म्हणजेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी! शहरात 1980 साली इंडियन रेडक्रॉस सोसायटीचीची स्थापना करण्यात आली.

या सोसायटीच्या माध्यमातून रक्तपेढी, आपत्ती व्यवस्थापन, ज्युनिअर व युथ रेडक्रॉस, प्रथोमचार प्रशिक्षण, जेनेरीक मेडीसीन व रुग्णालय, कॅन्सर प्रकल्प, व्यसन मुक्ती, पर्यावरण संरक्षण या सारख्या विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत आहे.

तसेच रक्तपेढीतर्फे चालविल्या जाणार्‍या जीवनदान योजनेअंतर्गत थँलेसीमीया, सिकल सेल्स, प्लॅस्टिक अ‍ॅनिमीया ग्रस्त 10 हजार 341 रुग्णांना विनामुल्य रक्तपुरवठा करुन त्यांना जिवनदान देण्यात आले असून कार्यस्वरुपी हा उपक्रम सुरु ठेवणार असल्याचा इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा मानस आहे.

दहा वर्षांत सव्वालाख रक्तदात्यांनी केले रक्तदान
रक्तदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असते. जनजागृतीमुळे दरवर्षी रक्तदात्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने इंडियन रेडक्रॉस सोसायटीमध्ये गेल्या दहावषात सुमारे 1 लाख 29 हजार 524 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

तसेचया सोयायटीतून आतापर्यंत सुमारे 1 लाख 76 हजार 140 रक्त वितरीत करुन रुग्णांना जीवनदान देण्यात आले आहे. दिवसेंदिवस रक्तदान करण्याविषयी जनजागृती होत असल्याने गेल्या दहा वर्षांत रक्तदात्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे.

ल्युकोरीडक्शन प्रक्रीयेमुळे वाढणार रुग्णांचे आयुष्य
मल्टी ट्रान्सफरंट रुग्ण, कॅन्सर ग्रस्त यासारख्या दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना शुद्ध रक्त उपल्बध व्हावे यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे रक्तादात्यांनी रक्त दिल्यानंतर त्यांच्या रक्ताची ल्युकोरीडक्शन प्रक्रिया केली जाणार आहे.

या प्रक्रीयेमुळे रक्तामध्ये असलेल्या दुषित पेशींना काढून टाकून रुग्णाला शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जाणार आहे.

ल्युकाडेरीडक्शन प्रक्रीया केलेले रक्त रुग्णांना दिल्यास त्यांना वारंवार रक्त देखील बदलावे लागणार नसून ल्युकोरीडक्शन प्रक्रियेमुळे रुग्णांना नक्कीच दिर्घायुष्य मिळणार आहे.

आगामी काळात विविध उपक्रम राबवणार
इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे संजीवनी जीवन रेखा कार्ड, तालुक्यांमध्ये सॅटेलाइट ब्लड स्टोरेज सेंटर, जेनेरीक औषधी दुकाने, जेनेरीक दवाखाना, थँलेसीमिया व सिकल सेल्स रुग्णांना प्रबोधनासाठी पालकांचा मेळावा या सारख्या विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन भविष्यात इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*