नववी, दहावीच्या तोंडी परीक्षेचे 20 गुण बंद

0
मुंबई । दि.14 । वृत्तसंस्था-नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षाच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या अधिकचे गुणांची पद्धत आता बंद होणार असून गुरुवारी राज्य शिक्षण मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.
नववीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी भाषा विषयांची 100 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. तर हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठीही लागू होईल.
भाषा विषयांसाठीची 20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा पद्धत बंद करण्यात आली आहे. फक्त नववीसाठी हे बदल यंदा असून याची दक्षता शाळांनी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

भाषा, द्वितीय भाषांच्या तोंडी परीक्षा नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये गुण देण्याचे अधिकार शाळांकडे आहेत.

त्यामुळे या परीक्षांमध्ये शिक्षक हातचे न राखता विद्यार्थ्यांना गुण देतात. त्यामुळेच निकाला वाढल्याचे बोलले जात होते.

त्यानंतर काहींनी यावर टीका केली होती. त्यामुळे परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गुरुवारी सांगण्यात आले.

यासंदर्भातील एक परिपत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केले.

त्यानुसार आता भाषा विषयांची 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. तर संयुक्त भाषा विषयांसाठी 50 गुण प्रत्येकी असा नवा पॅटर्न ठरविण्यात आला आहे.

भाषा विषयांची तोंडी परीक्षा यापुढे न घेण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*