राजकीय दबावामुळे सफाई ठेका रद्द

0
जळगाव । दि. 12 । प्रतिनिधी-शहरातील महाबळ परिसरातील वार्ड क्रमांक 36 मधील साफसफाईचा ठेका सहजीवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला दिला होता.
परंतू वार्डात साफसफाई होत नसल्याचे व तक्रारी वाढत असल्याचे कारण सांगून या वार्डातील नगरसेविका आश्विनी देशमुख यांनी राजकीय दबाव वापरुन हा ठेका रद्द केल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
महापालिकेत सफाई ठेक्याच्या विषयावरुन आज सहजीवन सहकारी संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेतली. ते म्हणाले की, महापालिकेने शहराची साफसफाई करण्यासाठी शहरातील काही वार्डांमध्ये स्वच्छतेचे ठेके दिलेले आहे.

दरम्यान सन 2014-15 मध्ये वार्ड क्रमांक 36 व 29 चा ठेका विनोद देशमुख यांचे सहकारी चालवित असल्याने या कालावधीत तत्कालीन नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी एकही तक्रार केलेली नाही.

तसेच या ठेकेदारांनी मजुरांचा भविष्य निर्वाह निधी जमा केलेला नाही. तसेच कर्मचार्‍यांचे पीएफ देखील महापालिकेत जमा केलेले नाही.

तरी देखील या ठेकेदारांचे बिले अदा झालेच कसे? त्याचप्रमाणे त्यांची ही बीले अदा करणार्‍यांवर मनपाप्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

..तर मग सर्व ठेके घ्या
नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी सांगीतले की शहरातील सफाईंचे ठेके हे 60 हजारात चालतात. परंतू महापालिका प्रशासनाने हे ठेके 3 लाख 40 हजारात दिलेले असून ठेकेदारांचा फायदा होत असेल तर मनपाने साफसफाईसाठी देण्यात आलेले ठेके देशमुख यांनी घेवून शहरातील साफसफाई करावी. तसेच ठेकेदारांनी देखील आपल्या ठेक्याचे काम श्री. देशमुख यांना एक लाख रुपये देवून शहराची साफसफाई करुन घ्यावी असे किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

स्ट्रिंग ऑपरेशनच्या व्हिडीओमध्ये छेडछाड
नगरसेविका आश्विनी देखमुख यांनी स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये कमिशन वाढवून देण्याचा आरोप नगरसेविका ज्योती चव्हाण त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण व आरोग्यधिकार्‍यांवर केला होता. परंतू या व्हिडिओ क्लिपची छेडछाड करुन संभाषण कापून सोयीनुसार तयार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नगरसेविका असल्याचा फायदा घेत व आरोग्याधिकार्‍यांना धमकी देत संबंधित ठेकेदारांना दंड करायला लावण्यास भाग पाडत असल्याचे किरण पाटील यांनी सांगीतले.

अहवाल न मिळताच ठेका बंद
प्रभाग क्रमांक 36 मध्ये दैनंदिन साफसफाई होत नसल्याच्या कारणावरुन आयुक्तांकडे तक्रार देण्यात आली होती. परंतू या तक्रारीचा चौकशी अहवाल अजून आलेला नाही. तरी देखील प्रभारी आयुक्तांनी राजकीय दबावापोटी ठेका रद्द केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दोन प्रभागांमध्ये एकच कामगार
नगरसेविका आश्विनी देशमुख यांच्या सहकार्‍यांचा सन 2014-15 मध्ये याच प्रभागातील ठेका होता. यावेळी ठेकेदार मिलींद सोनवणे व रुपेश ठाकूर या दोन ठेकेदारांकडून आपल्या वार्डाची साफसफाई एकाच कामगाराकडून केली जायची. तसेच कामगारांची हजेरीपुस्तकांवर या कामागारांच्या नावाची नोंदणी सारखी असल्याचे पुरावे नितीन सपके यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.

स्ट्रिंग ऑपरेशन आधी का दाखविले नाही
नगरसेविका आश्विनी देखमुख यांनी साफसफाईच्या ठेक्याबाबत स्ट्रिंगऑपरेशन केले होते तर त्यांनी आधी जाहिर का केली नाही? असा सवाल किरण पाटील यांनी उपस्थित केला.
यावेळी पत्रकार परिषदेत नितीन सपके, रमेश चौधरी, मिलींद चौधरी, धनराज चौधरी, उमेश गवळी, गोपाल राठी आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*