उद्दीष्टपूर्तीसाठी कृषी विभागाची दमछाक

0

जळगाव / मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत शेततळे उद्दीष्टपूर्तीसाठी कृषी विभागाची चांगलीच दमछाक होत आहे.

सद्यस्थितीला केवळ 876 शेततळे पूर्ण झाले असून 15 मेपर्यंत 2000 शेततळे पूर्ण करण्याचे आव्हान कृषी विभागासमोर उभे ठाकले आहे.

सिंचन समस्येवर मात करण्यासाठी राज्य शासनाने शेतकर्‍यांकरीता मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली आहे.

मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी दोन हजार उद्दिष्ट्य ठरविण्यात आले आहे.

हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे.

यात कृषि विभागाच्या जळगाव उपविभागात 470, अमळनेर उपविभागात 790 तर पाचोरा उपविभागात 740 असे एकूण 2000 शेततळे तयार करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*