जीएसटीमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी – डागा

0
जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-जीएसटी करप्रणाली जगात भारताच्या अगोदर सुमारे 105 देशांनी लागू केली अज्ञाहे. परंतू भारताने ज्याप्रकारे जी एस टी प्रणाली लागू केली आहे. ती जगात एकमेव असून या करप्रणालीमुळे अर्थ विभागातील शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन सीए प्रेमलता डागा यांनी केले.
जी.एच.रायसोनी बिझनेस मेनेजमेंटमध्ये आयोजित जीएसटी करप्रणाली संदभार्त आयोजित व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी संचालिका डॉ.प्रीती अगरवाल, विभागप्रमुख प्रा.मकरंद वाठ, प्रा.रफिक शेख, प्रा.राज कांकरिया, प्रा.प्रशांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना त्या सी ए डागा म्हणाल्या की आपल्या व्यवसाय बद्दलचा वर्ष भारत 36 वेळा रिटर्न फाईल करून अंतिम वार्षिक एक अहवाल शासनाला देणे अनिवार्य आहे.

तसेच चालू आर्थिक वर्षांच्या मध्यापूर्वीच्या टप्प्यात वस्तू व सेवा करप्रणाली लागू झाल्यानंतर कररचनेप्रमाणेच बचत व गुंतवणुकीचीही आता सवय बदलावी लागणार आहे.

त्याचप्रमाणे वाढीव सेवा करापोटी विमा, म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील खर्चही आता वाढणार आहे. अशा स्थितीत गुंतवणुकीची आगामी दिशा काय राहणार आहे.याविषयी त्यांनी विद्याथ्यार्ंना माहिती दिली.

त्याचप्रमाणे लागू झालेल्या कर प्रणालीमध्ये सी- जीएसटी, आय- जीएसटी, एस- जीएसटी, ही कर पद्धत कशी लागू केली जाते याविषयी त्यांनी माहिती दिली.

तसेच अर्थ करणानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात जीएसटी करप्रणालीचा कसा अभ्यास करून घ्यावा. नोकरी करा किंवा व्यवसाय त्याची कशी अंमलबजावणी ही कर प्रणाली समजून घेणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी जीएसटी करप्रणाली संदभार्त विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी निरासरण केले. सूत्रसंचालन व आभार प्रा.राहुल त्रिवेदी यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*