स्मार्ट फोनच्या अतिवापराने वृद्धत्वाचा धोका !

0
लंडन | वृत्तसंस्था :  ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे बर्‍याच वेळा विसरले जाते आणि लोक कशाच्या तरी आहारी जातात. अर्थातच त्याचा परिणाम काही चांगला होत नाही. सध्याही स्मार्ट फोनच अनेकांना व्यसनच जडले आहे. अशा लोकांच्या हालचाली आय ट्रॅकरच्या सहाय्याने संशोधकांनी नोंदवून त्याचा अभ्यास केला आहे.

या प्रकारच्या २५२ प्रकारच्या हालचाली वैज्ञानिकांनी नोंदवून त्याचे अध्ययन केले तेव्हा वेळेअगोदरच वृद्धत्व येण्यामागे स्मार्ट फोनचा अतिवापर असल्याचे त्यांना आढळून आले आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार स्मार्ट फोनवर बोलत बोलत रस्त्यातून चालताना तरुणवर्ग ८० वर्षांच्या वृद्धाप्रमाणे हालचाली करतो. म्हणजे तो अतिहळू चालतो. प्रत्यक्षात स्मार्ट फोन बोलत नसला तरी मेसेज वाचणे, पाठविणे असे उद्योग तरी करतोच.

त्यामुळे त्याचा चालण्याचा वेग आपोआपच कमी होतो. शिवाय स्मार्ट फोनच्या अतिवापराने मान, कंबर, पाठ यांची दुखणी वाढतात, शियाय स्मार्ट फोनमधून बाहेर पडणार्या किरणांमुळे डोळ्यांच्या विकारातही वाढ होते. या शिवाय मोबाईल यूजर्ससाठी जगभरातील सरकारांना पैसे खर्च करून वेगळ्या सुविधा द्याव्या लागतात ते वेगळेच.

चीनमध्ये तसेच नेदरलँडमध्ये त्यांच्यासाठी वेगळे पेवमेंट आहेत. मोबाईल स्मार्ट फोनमुळे नातेसंबंध कमी होत आहेत. कुटुंबातील संवादही कमी होतो आहे.

LEAVE A REPLY

*