जळगावच्या इच्छादेवी मंदिराजवळ एसटीच्या झालेल्या ‘त्या’ अपघातात सात जखमी : जीवीत हानी नाही

0
जळगाव | प्रतिनिधी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर खिरोदा येथून जळगावी येणार्‍या एस.टी. बसला भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने समोरासमोर दिलेल्या धडकेत बस मधील सात जण जखमी झाले आहेत.यात जीवीत हानी झालेली नाही.

सकाळी आठ वाजेच्या सुमारास रावेर तालुक्यातील  खिरोद्याहून जळगावकडे एस.टी बस क्रमंाक एम एच १९ बीएल ०३५२ येत होती. तर ट्रक क्रमांक एम एच १९ झेड ५३५६ हा भुसावळकडे जात होता.

ही दोन्ही वाहने  इच्छादेवी चौक ते आकाशवाणी चौका दरम्यान असलेल्या लाडवंजारीमंगल कार्यालयाजवळ  आली असता त्यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.

ही धडक इतकी जोरदार होती की यात एस.टीची ड्रायव्हरकडील बाजु कडील तीन चार सीटांपर्यंत बस कापली गेली.
यात बस चालक भागवत पद्माकर लोहार व वाहक तेजसींग ठाणसिंग राजपूत, एस.टी. बस मधील प्रवासी अजय पाटील
गायत्री पाटील, सरीता संजय पाटील, जानव्ही अजय पाटील, रूचीता संजय पाटील, कृतीका संजय पाटील
प्रतीभा संजय चौधरी (सर्व रा. मुक्ताईनगर, जळगाव) हे जखमी झालेत.

एसटीकडून प्रत्येकी हजार रूपये मदत

एस.टीतील जखमी प्रवाशांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांना प्रत्येकी एक हजार रूपये मदत देण्यात आली आहे.

ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रक एस.टी.वर

एस.टी.च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एस.टी. बस जळगावकडे येत होती. तरट्रक भुसावळकडे जात होता. ट्रक चालकाने दुसर्‍या एका ट्रकला  ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तो समोरून येणार्‍या एस.टीवर आदळला. यात जीवीत हानी झालेली नाही.

LEAVE A REPLY

*