तळेले कॉलनीतील समस्यांबाबत महिलांचे महापौरांना निवेदन

0
जळगाव |  प्रतिनिधी :  तळेले कॉलनीत सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारी नाही. त्यामुळे घरांमधील सांडपाणी रस्त्यावर देण्यात येत असते.
सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरुन दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने कॉलनीतील समस्या सोडविण्यासाठी कॉलनीतील महिलांनी महापौर नितीन लढ्ढा यांना निवेदन देण्यात आले.

समस्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास मनपासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा तळेले कॉलनीतील महिलांनी दिला आहे.

जुना खेडी रस्त्यावरील तळले कॉलनीत पक्क्या गटारी नसल्यामुळे घरातील सांडपाणी रस्त्यावर सोडण्यात आले आहे. यामुळे सांडपाणीचे डबके रस्त्यांवरच साचल्याने बरेच रहिवाशी व नागरिक पडून जखमी होत आहेत. पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यात विषारी जनवरांची व डासांची भिती असते.

याबाबत त्यांनी वारंवार महापालिकेसमोर कैफयत मांडत आहेत. तसेच कॉलनीत पक्क्या गटारी बांधून मिळवी अशी विनंती महिलांनी महापौरांना केली आहे. तसेच गेल्या २० वर्षांपासून सांडपाणी सोडण्यावरून आपसात भांडणे होत असल्याने शेजार्‍यांमध्ये वैर निर्माण झाले आहे. सध्यास्थितील कॉलनीत कच्च्या गटारी असून यावर काही नागरींकानी भर टाकून त्या बंद केल्या आहेत.

तसेच गटारींवर बेकायदशीर पणे भराव करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी देखील या महिलांनी केली. तसेच महापौरांनी त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी कॉलनीत येऊन प्रत्यक्ष पहाणी करावी असा आग्रह महिलांनी महापौर लढ्ढा यांना केला.

दरम्यान, महापौर लढ्ढा यांनी महिलांना शुक्रवारी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, शहर अभियंता सुनील भोळे यांच्यासह प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्‍वासन दिले.

यावेळी निवेदन देण्यात आले. निवेदनावर प्रतिभा शिरसाठ, योगिता पाटील, जयश्री खडके, प्रतिभा महाजन, निलीमा बोरोले, निता रोटे, ममता कोल्हे, अनिता जाधव, आशा पाटील, सुनीता सुर्यवंशी, कुमुदिनी भावसार, धनश्री चौधरी, कृष्णा चव्हाण, सविता चव्हाण, पिंकी चव्हाण, प्रीती सोलंकी शालिनी लोखंडे, देवकाबाई बारी, कल्पना भंगाळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*