महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण काळाची गरज-देवयानी ठाकरे

0
चाळीसगाव | प्रतिनिधी :  महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा, विविध कायदे असले तरी महिलांवर अत्याचार होवू नयेत यासाठी महिला स्वसंरक्षण प्रशिक्षणासारखे उपक्रम गाव पातळीवर राज्य महिला आयोगाच्या वतीने राबविले जात आहेत.

महिला स्वसंरक्षणासाठी अशी प्रशिक्षण शिबिरांची आज काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.

राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रायोजित महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रागंणात आयोजित कार्यक्रमात श्रीमती ठाकरे बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे, चाळीसगाव पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, जि.प सदस्य अतुल देशमुख, घोडेगाव गृप ग्राम पंचायतीच्या सरपंच अनुसया जाधव, उमंग समाज शिंपी परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, घोडेगाव जि.प.उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण, पंचायत समिती सदस्या, ग्रामपंचायत सदस्या आदि मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती ठाकरे पुढे म्हणाल्या की, महिला संरक्षणसाठी असलेल्या कायद्यांची माहिती महिलांना व्हावी यासाठी महिला आयोगाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

आयेागाच्या वतीने जिल्हास्तरीय, विभागस्तरीय कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे या कायद्याची महाविद्यालयीन स्तरावरीन विद्यार्थिनींना माहिती मिळावी म्हणून राज्यातील ११ विद्यापिठांमध्ये १५ हजार विद्यार्थिनींना आयोगाच्या माध्यामातून प्रशिक्षण देण्यात आले आहेत.

यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा परिषद शिक्षण सभापती पोपट भोळे, संपदा पाटील, जि.प सदस्य अतुल देशमुख, पोलीस उप निरिक्षक सुप्रिया देशमुख यांनी उपस्थित विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते ४ डिजीटल वर्ग खेाल्यांचे उद्घाटन करण्यात आले. प्रशिक्षण शिबिरात २०० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

शिबिरातील सहभागी विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थींनीनी प्रात्यक्षिके करून दाखविली कार्यक्रम यशस्वीतेसाठी घोडेगाव जि.प शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष वसंत चव्हाण यांच्यासह सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन चेतना निकम यांनी तर आभार विनय राठोड यांनी मानले.

LEAVE A REPLY

*