मलकापुरात मुख्याध्यापकावर गोळीबार : अडिच तासानंतर काढली गोळी

0
मलकापूर | प्रतिनिधी :  स्वताःच्या घरासमोर मोबाईलवर बोलत असतांना मुख्याध्यापकावर अज्ञात इसमांनी गोळी झाडल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील घिर्णी रस्त्यावरील महाराणा प्रताप नगरात दि.२८ च्या रात्री १०.४० वाजेच्या सुमारास घडली.

जखमीस गंभीर अवस्थेत कोलते हॉस्पीटलात दाखल करण्यात आले आहे. अडिच तासाच्या शस्त्रक्रियेनंतर गोळी बाहेर काढण्यात आली. रूग्णाची परिस्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान आरोपी ङ्गरार झाले असून पोलिसांनी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, मोताळा तालुक्यातील मौजे निपाणा येथील भिकमसिंह पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक रविंद्रसिंह गुलाबसिंह राजपूत (वय ४६) घिर्णी रस्त्यावरील महाराणा प्रताप नगरातल्या त्यांच्या राहत्या घरी रात्री १०.४० वाजता मोबाईलवर बोलत होते.

अचानक मोटरसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने पाठीमागून त्यांच्यावर गोळी झाडली. पाठी मागुन उजव्या बाजूने झाडलेली गोळी समोरील पोटाच्या डाव्या बाजूने आतड्यात ङ्गसली.

दरम्यान रक्तस्त्राव झाल्याने रविंद्रसिंह राजपूत खाली कोसळले. गंभीररित्या जखमी झाल्यावरही त्यांनी रक्ताच्या थारोळ्यातील अवस्थेत त्यांच्या घराशेजारील मित्र छोटू व संदेश चोरडिया यांना ङ्गोन लावला व त्यांच्या मदतीने रात्री ११ वाजेच्या सुमारास कोलते हॉस्पीटल गाठले.

शल्यचिकित्सक डॉ.अरविंद कोलते व डॉ.गौरव कोलते यांनी तात्काळ रूग्णास ऑपरेशन थिऐटरमध्ये दाखल केले व उपचार सुरू केले. तब्बल अडिच तासाच्या शस्त्रक्रियेनंतर रविंद्रसिंह राजपूत यांच्या पोटातील गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.

सध्यस्थितीत रूग्णास कृत्रीम श्‍वासोश्‍वासावर ठेवण्यात आले. त्यांची प्रकृतीस्थिर पण नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेत अज्ञात इसम कोण असावेत व त्यांनी कोणत्या कारणावरून गोळी झाडली.

या संदर्भातचा उलगडा अजून झालेला नाही. शहर पोलिसांनी जखमीच्या पत्नी सौ.सपना रविंद्रसिंह राजपूत यांना दाखल केलेल्या ङ्गिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरूध्द अपराध नं.३०६/१६ कलम ३०७, ३४ भा.दं.वि. आर्म ऍक्ट ३,२५ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस निरिक्षक व्ही.एन. ठाकरे पुढील तपास करित आहेत.

या घटनेमुळे महाराणा प्रताप नगरात एकच खळबळ उडाल आहे.

LEAVE A REPLY

*