कुर्‍हे येथे चिखली नदीवर सिमेंट बंधार्‍यांचे भूमिपूजन

0
अमळनेर | प्रतिनिधी :  तालुक्यातील कुर्‍हे बु. येथे चिखली नदीवर जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बंधार्‍यांचे भूमिपूजन आ. शिरीष चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या नदीवर लोकसहभाग आणि हिरा उद्योग समूहाच्या आर्थिक योगदानातून सर्वात मोठे नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले असून सिमेंट बंधार्‍यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आडवले जाऊन शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे

आ. शिरीष चौधरी यांनी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत ११ लाख निधीतून या सिमेंट बंधार्‍यांचे काम मार्गी लावले आहे. कुर्‍हे बु.॥ व कुर्‍हे खु. हि गावे चिखली काठावर असून या नदीवर एकही बांध नसल्याने पावसाळ्यात नदिला आलेले संपूर्ण पाणी वाहून जात होते. परीणामी येथील विहीरी कोरड्या राहून शेतीसह पिण्याच्या पाण्याची समस्या कायम भेडसावत होती.

तसेच या नदीत वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी जिरण्यास कोणताही वाव नव्हता. अखेर संपूर्ण मतदार संघात हिरा उद्योग समूहाच्या मदतीने नाला खोलीकरण मोहीम राबवून आ. शिरीष चौधरी आणि हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांनी कुर्‍हेची परिस्थिती लक्षात घेऊन चिखली खोलीकरणाचे काम हाती घेतले

यासाठी हिरा उद्योग समूह आणि लोकसहभागातून मोठा निधी उपलब्ध झाल्याने अतिशय मोठ्या प्रमाणात खोलीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे.

आता आ.चौधरी यांनी शासनाच्या निधीतून सिमेंट बंधार्‍यांचे काम मार्गी लावले असून नुकतेच याचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामास सुरवात झाली आहे, लवकरच हे काम पूर्णत्वास येऊन याच पावसाळ्यात पाणी आडविण्याचे नियोजन असून तश्या सूचनाही आ. चौधरी यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

या बंधार्‍यात पाणी अडवले गेल्यानंतर या आधी झालेल्या खोलीकरणामुळे परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.

आ.शिरीष चौधरी आणि डॉ. रवींद्र चौधरी हे खर्‍या अर्थाने तालुक्यात जलमय अभियान राबवित असल्याची भावना व्यक्त होत आहे. भूमिपूजन प्रसंगी आ. शिरीष चौधरी, प्रा अशोक पवार, ऍड. व्ही आर पाटील, ऍड. सुरेश सोनवणे, ऍड. दीपेन परमार, नरेंद्र चौधरी, सुनील भामरे, प्रवीण पाटील, सुनील पाटील, विलास पाटील, सतीश पाटील, महेंद्र पाटील,भरत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*