ग्रिन झोन यावल तालुका डार्कझोनमध्येच !

0
 अरुण पाटील | यावल :   यावल तालुका हा ग्रिनझोन म्हणून ओळखला जात असून प्रत्यक्षात सन २०११ च्या भु-जल सर्वेक्षणानुसार तालुक्यातील ५४ गावांची भूजल पातळी खोल गेल्याने तालुका डार्कझोन मध्ये गणला जात आहे.
तर तालुक्यामधील छोट्या-छोट्या धरणाचे काम अपुर्णच असून सिंचन क्षेत्राकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
चिंचोली पासून तर थेट ङ्गैजपूर पर्यंत केळी,उसाची लागवड ठिबक संचावर शेतकरी वर्ग करताना दिसतात.

दिल्ली पासून गल्ली पर्यंत यावल तालुका हा हिरवा पट्टातील तालुका म्हणून बोलले जाते.मात्र भुजल पातळी ४०० ते ५०० ङ्गुटापर्यंत गेल्याने कुपनलीका करणे हाच एक उपाय या तालुक्याला उरला आहे.

शासनाकडून ज्या विहीरी मंजुर होतात त्या १४०/१५० ङ्गुट खोदकाम करणारे मजुरही आता धजावत नाहीत.दैवावर जे काम चालते ते नाममात्र दिसते.सातपुडा पर्वत रांगामधुन वाहणारे नद्या,नाते यांच्यावर कायमस्वरूपी बंदीस्त बंधार्‍याची यावल तालुक्यात गरज आहे.

नव्हेतर सातपुड्यातील हरीपुरा,वाघझिरा,मनुदेवी,काळाडोह,निंबादेवी,मोरधरण या धरणाचे काम १५ वर्षातही पुर्ण झाले नाही.शेळगाव बॅरेजचे कासवगतीने होणारे काम असेच चालले तर युतीशासनाच्या तरी खाळखंडात हे पुर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही.

हतनूर धरणाच्या कालव्यात ऐन उन्हाळ्यात पाणी धरणात राखीव ठेवले जाते.त्यामुळे शेतकर्‍यांना ङ्गायदा होत नाही.उन्हाळ्यात कमीत कमी मार्च,एप्रील, मे मध्ये नदी नाल्यात १ दिवस जरी पाणी सोडले तरी परीसरातील भुजल पातळीत वाढ होवू शकते व गुराढोरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटू शकतो

शेतात कुपनलीका असल्याने सर्वच शेतकरी पाईपद्वारे ठिबक मध्ये पाणी शेतात सोडतात.त्यांना जेमतेम बागायती पिके घेण्यासाठी उन्हाळ्यात रक्ताचे पाणी करावे लागते.

सौखेडा शिवारातील नागादेवी पाझर तलाव सन २००६ च्या अतिवृष्टीत ङ्गुटला.आघाडी शासनातील साडेतीन पालकमंत्री झालेत त्यांनी ङ्गक्त आश्‍वासन दिलीत. ती आश्‍वासनच राहिलीत. मात्र नागादेवीचा प्रश्‍न मार्गी लागला नाही.

सौखेडा, दहिगाव,नायगाव,परीसरातील भू-जल पातळी कधी नाही ऐव्हढी खोल गेली आहे. नव्याने युतीचे शासन आले.मात्र दुदैव यावल तालुका वासियाचे पालकमंत्री बाहेरील असल्याने त्याच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळच नाही.

तर राज्याचे जलसंपदा मंत्री हे सुध्दा जिल्ह्यातीलच आहेच वास्तविक त्यांनी सिंचनाचा प्रश्‍नाकडे लक्ष घालण्याची गरज असून शासनाने शेतकर्‍यांना जरी कर्ज माङ्गी दिली असली तरी सिंचनाचा भेडसावणारा प्रश्‍न या कडे लक्ष न घातल्यास येत्या विधानसभा निवडणूकीसाठी युतीच्या संभाव्य उमेदवारांना कळीचा मुद्दा ठरू शकेल असा अंदाज व्यक्त होत आहे.

यावल तालुक्यातील यावल पासून पुर्वे कडील भाग हा रावेर मतदार संघात त्याचे नेतृत्व भाजपाचे आ. हरीभाऊ जावळे तर पश्‍चिमेकडील भाग चोपडा मतदार संघात येत असून त्याचे नेतृत्व शिवसेनेचे आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे हे करतात.

या दोघांनी यावल तालुक्यातील भू-गर्भातील पाणी पातळी उंचावण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्याची अपेक्षा यावल तालुका वासिय करीत आहेत.

LEAVE A REPLY

*