मुक्ताईनगरच्या हॉटेल दिपालीवर धाड : तीन लाखांची दारु जप्त

0
मुक्ताईनगर | वार्ताहर :  येथील बोदवड रोडवरील हॉटेल दिपालीवर डि. वाय. एस. पी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला असता तीन लाखांची अवैध दारु आढळुन आल्याने हॉटेल दिपालीवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईने मात्र शहरासह तालुक्यातील अवैध दारु विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

याबाबत डि. वाय. एस. पी कार्यालयाकडुन मिळालेल्या माहिती वरुन गेल्या अनेक वर्षा पासुन मुक्ताईनगर शहरात काही ठिकाणी सर्रासपणे अवैध दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती नुकतेच डि. वाय. एस. पी. पदाची सुत्रे हाती घेतलेले सुभाष नेवे यांना मिळाली.

इतकेच नव्हे तर उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की, महागार्मापासुन ५०० मिटर अंतराच्या आत दारु विक्रीची दुकाने बंद करण्यात यावीत परंंतु सदरचे नियम धाब्यावर बसवुन सर्रासपणे चढ्याभावाने अवैधरित्या दारु विक्री सुरु आहे.

त्याच पार्श्‍वभुमीवर नुकतेच डि. वाय. एस. पी. पदाची सुत्रे हाती घेतलेले सुभाष नेवे यांनी गुप्त माहितीच्या आधारे जि. पो. अधिक्षक दत्तात्रय कराळे तसेच ऍडिशनल जि. पो. अ. बच्चनसिंग यांचे मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर येथील बोदवड रोडवरील महालक्ष्मी गॅस एजेंसी शेजारील हॉटेल दिपालीवर दुपारी एक ते दिड वाजेच्या दरम्यान छापा टाकला\

सहा हजार चारशे ४२ रु च्या विदेशी दारुच्या बाटल्या ५१ हजार आठशे रुपयांच्या कॅनॉन व इतर बिअर बाटल्या तसेच दोन लाख ३५ हजार ६६० रु च्या विदेशी दारुच्या बाटल्यांचे बॉक्स व सुट्या बाटल्या असा एकुण दोन लाख ९१ हजार दोनशे दोन रुपये किंमतीचा माल जप्त केला.

या कारवाईने मात्र अवैध दारुची विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान डि. वाय. एस. पी. कार्यालयाचे पो. हे. कॉ. बाबुराव रामदास अटकाडे यांच्या फिर्यादीवरुन हॉटेल दिपालीचे रमेश पाव्हणु लोखंडे यांचेवर मुंबई पोलिस ऍक्ट कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर पथकात डि. वाय. एस. पी सुभाष नेवे यांचेसह त्यांचे मार्गदर्शनाखाली पो. कॉ. अतुल बोदडे, विनोद पाटील, स. फौ चालक सुरेश तायडे, अक्षय हिरोळे, आदिंच्या पथकाने कारवाई केली. सदर कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवेच्या ५०० मिटर अंतराच्या आतील दारु दुकाने बंद करण्याचे आदेश होते. परंतु बहुतांश ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. इतकेच नव्हे तर न्यायालयाच्या दारुबंदीच्या आदेश असतांनाही कुर्‍हा गावातील दारुचे धंदे पुन्हा तेजीत सुरु झालेले आहेत. तसेच इतर अवैध धंदेही सर्रासपणे सुरुच आहेत.

त्याबाबत भाजपाचे तालुका सरचिटणीस डॉ. बी. सी. महाजन यांचेसह ग्रामस्थांनी जिल्ह पोलिस अधिक्षक यांचेकडे तक्रार दिेलेले आहे. त्यापूर्वी दारुबंदी व्यसनमुक्ती संघटनेच्या प्रणेत्या तसेच माजी प. स. उपसभापती सौ. प्रमिला भागवत राठोड यांनीही दारुबंदीची चळवळ उभारुन कुर्‍हा येथे दारुबंदी केली होती.

परंतु त्यानंतर महिन्या भरात न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवुन सर्रासपणे दारु विक्री सुरु आहे. त्यास आळा बसेल काय? अस सवालही उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

*