कळमसरे येथील दोन शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण : सात विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली

0

कळमसरे, ता.अमळनेर,| वार्ताहर :  येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील दोन्ही शिक्षकांची बदली रद्द करावी, यासाठी मागील आठवड्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. तरीही शाळा प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यामुळे दि. २७ रोजी सकाळी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन करत उपोषणाला बसले. त्यात ७ मुलींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांचेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर त्यापैकी एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्यात आले.

शारदा विद्यालयाचे उपशिक्षक सुरेश पावरा व के. जे. सोनवणे यांची शालेय स्तरावर किनोद (ता.जळगाव) येथे शालेय प्रशासनाने बदली केली होती. त्यावेळी ह्या दोन्ही शिक्षकांची बदली रद्द व्हावी, ह्यासाठी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत उपोषण केले होते व गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले होते.

त्यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहारावर बहिष्कार टाकून शालेय कामकाज बंद करत एकही शैक्षणिक तास होऊ दिला नव्हता. त्यावेळी शालेय प्रशासनाने संस्थेची सभा बोलवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते.

आश्वासनानंतर विद्यार्थ्याचे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु आठ दिवस उलटूनही बदली रद्द करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे मंगळवारी विद्यार्थ्यानीं आंदोलनास सुरवात केली.

दि. २७ रोजी सकाळी ६.३० वाजेपासून शाळेतील सुमारे २०० ते २५० विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलनास बसले. आमचे सर परत येत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, असा पवित्रा विद्यार्थ्यानी घेतला पावरा सर परत या नको हुकूम शाही अशा घोषणा दिल्या

तर पाडळसरे, खेडी व वासरे येथील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात ङ्गेरी काढत शाळा व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला. सकाळी शाळा सुरु होण्यागोदर विद्यार्थी प्रवेशद्वारावर बसल्यामुळे शालेय कामकाज बंद होते तर संतप्त विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहारावर बहिष्कार टाकत एकही तास होवू दिला नाही.

दरम्यान सकाळी ६.३० वाजेपासून बसून घोषणा देणार्‍या ७ विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. त्यात हर्षदा रनछोड पाटील वय ११, नेहा मनोज चौधरी १३,विद्या युवराज पाटील १०,धनश्री विजय चौधरी १३,मनीषा रणजितसिंग पाटील १३,गायत्री हेमंत पाटील १३,रुचिका प्रकाश कुंभार १३ ह्यांना चक्कर व मळमळ होत असल्याने शासकीय रुग्णवाहिकेला बोलवून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यात हर्षदा रनछोड पाटील वय ११ हिची प्रकृती जास्त खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

२०१६-१७ संच मान्यतेत कळमसरे शाळेत २५ शिक्षक मंजूर असताना २७ शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे दोन शिक्षक अतिरिक्त ठरत होते. याउलट संस्थेच्या किनोद शाळेत १८ शिक्षक मंजूर असताना १६ शिक्षक कार्यरत होते. यात एक प्रशिक्षित पदवीधर व दूसरा एच.एस.सी.डी.एड. असे दोन शिक्षकांची पदे रिक्त होती. शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.जळगाव यांच्या आदेशाने संस्था पातळीवर समायोजनासाठी दि. १६ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या सभेत डी.एड. मधून एस.एङ्ग.पावरा, प्रशिक्षक पदवीधरमधून के.जे.सोनवणे यांची बदली करण्यात आली होती.

त्यांचा पगार तिकडे घेत होते. सन २०१७-१८ या वर्षाच्या संचमान्यतेत पद मंजूरीनंतर उद्भवणार्‍या परिस्थितिनुसार विचार करता येईल, असे संस्थाचालकांचे म्हणणे होते.

मात्र विद्यार्थी व शिस्तप्रिय शिक्षकांची बदली अचानक केल्याने पालक व विद्यार्थ्यांनी विद्रोह केला असून यात यांची बदली हेतुपुरस्कर केल्याचा आरोप पालक व विद्यार्थ्यांमधुन होत आहे.

यावेळी पालक व विद्यार्थ्याचे आंदोलन जास्तच जोर धरत असल्याचे पाहून शाळा प्रशासनाने मारवड पोलीस स्थानकाचे सपोनि अवतारसिंग चव्हाण व पोलीस कुमक यांना पाचारण करण्यात आले

परंतु संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांचे काही एक ऐकून घेतले नाही तर पालकांनी मुख्याध्यापकांकडे मुलांचा दाखला मागण्यास सुरवात केली आणि दुपार पर्यंत २५ दाखले देण्यात आले.

तर १०० ते १५० विद्यार्थ्यांच्या दाखला मागण्या तयार असून काही पालकांच्या स्वाक्षर्‍या बाकी राहिल्याने उद्या पर्यन्त मागणी केली जाणार आहे. गट शिक्षणाधिकारी ए डी पाटील यांनी पावरा यांची झालेली बदली नियमानुसार असल्याचे म्हटले आहे.

पावरा यांची बदली हेतुपुरस्कर आणि अन्यायकारक असल्यानेच विद्यार्थी व पालकांना आंदोलन करावे लागत आहे. यात पावरा यांनी शाळेत दिवसरात्र एक करुन विद्यार्थी हित जोपासले.

रात्रीची अभ्यासिका सुरुवात केली. होतकरु विद्यार्थ्यांना स्वखर्चाने मदत केली. शालेय अभ्यासक्रमाबरोबर सांस्कृतिक, क्रीडा, सामान्यन्यान, आदी स्तुत्य उपक्रम स्वयंस्ङ्गूर्तिने भाग घेतात यामुळे त्यांची बदली रद्द होत नाही तो पर्यंत आंदोलन स्थगित होणार नाही, असा इशारा पालकांनी आणि विद्यार्थ्यांानी दिला आहे.

एस ए़ङ्ग पावरा यांची बदली संस्थेच्या प्रशासकीय नियमानुसार करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या जागी नव्याने कार्यक्षम असे शिक्षक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची मागणी गैर आहे.
-पी. पी. पाटील,  मुख्याध्यापक, शारदा माध्यमिक

LEAVE A REPLY

*