दारु दुकानाला परवानगी दिल्यास आंदोलन : महाबळमधील नगरसेवकांसह नागरिकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
जळगाव |  प्रतिनिधी |:  महाबळ परिसरातील साईप्लाझा या इमारतीत दारु दुकानाला परवानगी देवू नये. परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

महाबळ परिसरात बियरबारमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कधी-कधी याठिकाणी वाद असल्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण होते.

साईप्लाझा या इमारतीतील पुन्हा नवीन दारुचे दुकान सुरु करण्याची हालचाल सुरु झाली आहे. त्यामुळे नवीन दारु दुकानाला परवाना देवू नये अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी नगरसेवक नितीन बरडे, पृथ्वीराज सोनवणे, नगरसेविका अश्‍विनी देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*