भुसावळ न.पा.तर्फे दुर्बल घटकांना लवकरच घरकुले- नगराध्यक्ष रमण भोळे

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांना व अल्प उत्पन्न असणार्‍या लाभधारकांना भुसावळ नगरपरिषदेतर्ङ्गे घरकुले उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष रमण भोळे यांनी येथे केले.

भुसावळ येथील प्रभाग क्र.१ मध्ये सर्वांसाठी घरकुले या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक अमोल इंगळे, रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव, जगदीश विभांडिक, आकाश सोनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

भुसावळ शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत माजी महसुलमंत्री आ.एकनाथराव खडसे, खा.रक्षा खडसे, आ.संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांसाठी घरकुले ही योजना भुसावळ पालिकेने उपलब्ध करून घेतली आहे.

या योजनेंतर्गत ज्यांना स्वतःचे घर नाही त्यांच्यासाठी घरे उपलब्ध करून देण्यात येतील.यासाठी ही योजना चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात ज्यांना स्वतःची घरे नाहीत किंवा अतिक्रमित जागेत घरे आहेत त्यांचा प्रथम अर्ज भरून घेण्यात येणार आहे.

दुसरा टप्पा ज्यांच्याजवळ स्व मालकीची जागाआहे त्यांची व्यवस्था करण्यात येईल. तिसर्‍या टप्प्यात भाडेकरूंसाठी व्यवस्था होईल. चौथ्या टप्प्यात जे बिल्डर शासकिय सवलती घेवून घरे बांधून त्यातील काही भाग हा गरिब जनतेसाठी देतील त्या घरकुलांमध्ये काही लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे.

सर्वांसाठी घरकुले या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड, नगरपालिकेच्या भरत असलेल्या कराच्या अद्ययावत पावत्या, घराचे लाईटबिल, बँकेचे पासबुक झेरॉक्स, स्वप्रमाणीत उत्पन्नाचा दाखला, पुरूष व स्त्री यांचा पासपोर्ट ङ्गोटो, स्व मालकीची गावठाणात जागा किंवा नवीन ले आऊटमध्ये प्लॉट असल्यास त्या जागेची कागदपत्रे, २०११च्या जनगणनेनुसार यादीत लाभ धारकाचे नाव असल्यास अथवा त्या पुर्वीपासून स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला आदींची झेरॉक्स प्रत अशा कागदपत्रांची गरज आहे.

भुसावळ शहरात वार्ड क्र. १ पासून या योजनेची सुरूवात झाली असून या माध्यमातून शहरातील बेघर व गरिब जनतेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन नुसार दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच शहराचा नगराध्यक्ष म्हणून सर्वांसाठी घरकुले म्हणून जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे व उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*