मुक्ताईनगर येथे दारु जप्त: आठ जणंविरुध्द कारवाई

0
मुक्ताईनगर | वार्ताहर :  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५०० मीटर अंतराच्या आतील हॉटेल्स तसेच विनापरवाना अवैध दारु विक्री करणार्‍या सुमारे आठ विविध ठिकाणी पोलीसांच्या पथकांनी कारवाई करत ३ लाख १६ हजार ८५८ रुपयांची देशी विदेशी दारुच्या बॉक्ससह आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने मात्र अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहे.

आज सर्वात मोठी कारवाई डि वाय एस पी सुभाष नेवे व त्यांच्या पथकाद्वारे मुक्ताईनगर येथील दिपाली हॉटेलवर करण्यात आली. त्यात २ लाख ९१ हजार २०२ रुपये किंमतीची अवैध विक्रीसाठी असलेली दारु ताब्यात घेण्यात आली.

त्यानंतर मुक्ताईनगरचे डिवायएसपी सुभाष नेवे यांचे मार्गदर्शनाखाली तर एस पी दत्तात्रय कराळे व अति.एस पी बच्चनसिंग यांचे आदेशाने मुक्ताईनगर पोलीस प्रशासनातर्फे तालुक्यातील सात ठिकाणी कारवाई करण्यात आली त्यात सुमारे २५ हजार ६५६ रुपयांची दारु ताब्यात घेण्यात आली.

यात पुरनाड फाट्यावर तेजराव श्रीराम पाटील, रा. पुरनाड यांचेकडून २०८० रु. किमतीची ४० टँगो दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. शालीमार ढाब्याजवळ विजय तुळशिराम भोलाणे रा. बामखेडा यांचेकडून २३४० रु. किमतीची बॉबी संत्रा कंपनीच्या ४५ बाटल्या, सुधाकर पाटील यांचेदुकानाजवळ पुंडलिक पांडुरंग सपकाळे रा. खामखेडा यांचेकडून ३७४४ रुपये किंमतीच्या ७२ बॉबी संत्रा बाटल्या जप्त केल्या.

तसेच शेमळदा येथील राजू हरचंद जवरे यांचेकडून ४९९२ रुपयाच्या ९६ बॉबी बाटल्या जप्त केल्या. मुक्ताईनगर येथील बोदवड रत्यावरील हॉटेल वेदांत मध्ये ७५०० रु. किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या आरोपी निलेश लिलाधर वाणी यांचेकडून जप्त केल्या तर कुर्‍हा येथे राहू अग्रवाल व रमेश जैस्वाल यांचे राहते घरातून ५ हजार रु. किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या.

यावरुन ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस विभागीय अधिकारी सुभाष नेवे, पोनि अशोक कडलग, पोउनि सचिन इंगळे, एपीआय हेमंत कडकार या अधिकार्‍यांसह पथकात संतोष नागरे, सुभाष पाटील, रविंंद्र मेढे, एएसआय नमायते, कांतीलाल केदारे, कल्पेश आमोदकर, सुनिल बडगुजर, या कर्मचार्‍यांच्या पथकाने तालुक्यात कारवाई केली.

दरम्यान एक महिन्यापुर्वीचे आय पी एस अधिकारी निलोत्पल यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्यावरील रावसाहेब हॉटेलवर मोठी कारवाई केली होती त्यानंतर आज डिवायएसपी सुभाष नेवे यांचे मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईचे तसेच आयपीएस अधिकारी निलोत्पल, डिवायएसपी सुभाष नेवे, पोनि कडलग, पोलीस प्रशासनाचे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले असुन सदर कारवाई अशीच चालु राहील काय? असा सवालही उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

*