भारतच अमेरिकेचा खरा मित्र – डोनाल्ड ट्रम्प : दहशतवादाविरोधात भारत अमेरिकेची एकजुट

0
 जगभरात धुमाकुळ माजवणार्‍या दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका एक झाले आहे. कोणत्याही देशाने दहशतवादाला थारा देवू नये असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्या भेटीकडे जगभराचे आणि विशेषत: दहशतवादाास खतपाणी देणार्‍या राष्ट्रांचे लक्ष लागले होते.

व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बहुचर्चित भेट सोमवारी रात्री पार पडली.

या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीनंतर मोदी आणि ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दहशतावाद नष्ट करणे यावर आमचा भर असेल असे ट्रम्प यांनी सांगितले.

आम्ही दहशतवाद, कट्टरतावाद यावर चर्चा केली असून याविरोधात एकमेकांना सहकार्य करण्यावर एकमत झाल्याचे मोदींनी सांगितले.

भारत अमेरिकेचा खरा मित्र

या भेटीत बोलतांना ट्रम्प यांनी सांगितले की, भारत एक अतुलनीय देश असून मोदींची व्हाईट हाऊसमधील उपस्थिती ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. भारत हा अमेरिकेचा खरा मित्र असून भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास होत आहे. अफगाणिस्तानमधील भारताच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. मोदींनीही ट्रम्प यांचे आभार मानले. भारत आणि अमेरिका हे जगाच्या विकासात इंजिन म्हणू काम करणार आहेत. ‘न्यू इंडिया’ आणि ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या मोहीम एकसमान आहे असे मोदींनी आवर्जून सांगितले. सक्षम अमेरिकेत भारताचेही हित असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*