बोदवडला उद्या राष्ट्रीय एकता मेळावा

0
बोदवड | प्रतिनिधी :  आरक्षणाचे आद्य जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त उद्या रविवार दि.२५ जून रोजी राष्ट्रीय एकता मेळाव्याचे आयोजन येथील जनहित ङ्गाऊंडेशनचे प्रमुख बी.डी. इंगळे यांच्या संकल्पनेतून स्थानिक बाजार समितीमधील कृषी भवनात केले आहे.

शाहू जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य डॉ.उध्दवराव पाटील राहतील. मेळाव्याचे उद्घाटक नगराध्यक्षा मुमताज बी सईद बागवान यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलिस निरिक्षक अनिरूध्द आढाव, जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकर राणे, बोदवड नगरपंचायतीचे गटनेते कैलास चौधरी, सामाजिक कार्यकर्ते एस.एस. पाटील उपस्थित राहणार आहेत.

जनहित ङ्गाऊंडेशन आणि आरक्षण संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची साजरी केली जाते. यंदा शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन सचिव संतोष निकम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*