पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे गावठीवर पोलिसांची धाड : ३० हजाराचे रसायन नष्ट

0
पाचोरा | प्रतिनिधी : तालुक्यातील शिंदाड येथे पाचोरा पोलिसांनी गावठी हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यावर आज धाड टाकून सुमारे ३० हजार रूपये किंमतीचे रसायन नष्ट केले आहे.

आज दि 21 रोजी पिंपळगाव हरे पो स्टे हद्दीत शिंदाड़ गाव परिसरात उपविभागीय पो अधिकारी, पाचोरा केशव पातोंड  यांचे मार्गदर्शनाखाली सहा पो निरीक्षक संदीप पाटील, पो उप निरी वाघ, पो हवालदार दिलीप पाटील , पो हवालदार हरी पवार, पो शि किशोर राठोड़, पो शि विनोद पाटील, पो शि धीरज मंडलिक अशा पथकाने गावठी हातभट्टी दारू च्याअड्ड्यावर धाड टाकली.

त्यात अनुक्रमे रु 8500/- चे रसायन जागेवर नष्ट केले व दुसऱ्या रेडमध्ये रु 22000/- चे कच्चे पक्के रसायन, गावठी हातभट्टी दारू व दारू बनविन्याचे साधन सहित्यासह आरोपी सुपडु सिकंदर तडवी रा शिंदाड़ यास जागीच ताब्यात घेतले व सर्व मुद्देमाल जागेवर नष्ट केला.

पिंपळगाव पो स्टे ला  दस्तगीर जहागीर तडवी रा शिंदाड़ याचेवर व सुपडु सिकंदर तडवी रा शिंदाड़ याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

*