युवा मोर्चा हा भाजपाच्या रक्तवाहिन्या : प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर : पाटणादेवी येथे भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक

0
चाळीसगाव, | प्रतिनिधी :  भारतीय जनता युवा मोर्चाचे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांचे उत्तर महाराष्ट्र विभागीय जिल्हाध्यक्ष, युवती प्रमुख, सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर, सरचिटणीस आ. उन्मेष पाटील, अमोल जाधव व जिल्हा पदाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटणादेवी येथ आढाव बैठक घेण्यात आली.

बैठकीचे उद्घाटन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.  युवा मोर्चा हा भाजपाच्या रक्तवाहिन्या असून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे.

युवा मोर्चाने राज्याला व देशाला अनेक नेते दिल्यामुळे कार्यकर्त्यांना काम करण्याची मोठी संधी यामुळे प्राप्त होते. पुढील कालावधीत अधिक जोमाने कामाला लागून संघटना वाढवावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी केले.

आ. उन्मेश पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, युवा पदाधिकार्‍यांच्या मेहनतीमुळे उत्तर महाराष्ट्रात अनेक नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत प्रथमच भाजपाचे कमळ फुलले.

आगामी काळात संघटना वाढीबरोबरच मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा देणारी ऐतिहासिक राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना, पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजना विद्यार्थी- पालकांपर्यंत पोहचविण्यासाठी कॉलेज कनेक्ट अभियान, युवा महिला लोकप्रतिनिधी यांची सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी घे भरारी परिषद, आदी उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती दिली.

सरचिटणीस अमोल जाधव, गितांजली ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी चिटणीस गितांजली ठाकरे, विनोद दळवी, सचिन हांडगे, राजेश घुगे, पंकज जैन, प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्नील लोकरे, जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, शहराध्यक्ष अक्षय मराठे उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

*