साकेत एक्सप्रेसमधून धूर

0
भुसावळ | दि.२१ | प्रतिनिधी :  डाउन क्र.११०६७ लोकमान्य टिळक टिर्मिनस फैजाबाद साकेत एक्सप्रेसच्या एक डब्यातून धुर निघत असल्याने गाडी भुसावळ स्थानकावर थांबवून दुरुस्ती करुन दुपारी गाडी रवाना करण्यात आली

मिळालेल्या महितीनुसार, गाडी क्र ११०६७ लोकमान्य टिळक टर्मिनस फैजाबाद साकेत एक्सप्र दि. २१ जून रोजी दुपारी१२.३७ वाजता भुसावळ स्थानकाजवळील दगडी पुलाजवळ असतांना गाडीच्या इंजिनापासून सातव्या डब्यात डायनेमो बेल्टमधून धुर निघाल्याने हा कोच क्र. सीआर ००४५६ जीएससीएन गाडी पासून वेगळा करण्यात येवून दुरूस्त करण्यात आला.

या प्रकारामुळे डब्यातील व गाडीतील प्रवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली होती. या प्रकारामुळे गाडी क्र १२७७९ गोवा एक्सप्रेस, गाडी क्र. १२८५९ गीतांजली एक्सप्रेस या गाड्या १५ मिनिट उशीराने धावल्या.

LEAVE A REPLY

*